राज्यात महायुती 220 नव्हे तर 250 च्या पार ! पुण्यातील 8 ही जागा जिंकणार, कोथरूडचं लीड 1.60 लाखांवर (व्हिडिओ)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सकाळपासूनच प्रचंड उत्साहात नागरिकांनी केलेल्या मतदानामुळे राज्यात महायुती २२० नाही तर २५० हून अधिक जागांवर विजय होईल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

मतदानाला बाहेर पडणाऱ्या नागरिकांची देहबोली पाहता पुण्यातील आठही जागांवर भाजपा शिवसेना आरपीआय महायुतीचे उमेदवार विजयी होतील. तसेच कोथरूडमध्ये मला १.६० लाखांहून अधिक आघाडी मिळेल असा ठाम विश्वासही चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीसाठी होत असलेल्या मतदानाचा आढावा चंद्रकांत पाटील यांनी विविध मतदान केंद्रांवर जाऊन घेतला. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

विरोधकांनी केलेला कांगावा, याचा मतदारांवर जराही परिणाम झालेला दिसून येत नाही, असे स्पष्ट करून चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या चार दिवसात हवा फिरली आहे, असे शरद पवार यांचे विधान अनाकलनीय आहे. हवा कोणत्या बाजूने फिरली आहे हे मात्र पवार साहेबांनी स्पष्ट केलेले नाही.

नेहमीप्रमाणेच त्यांनी कोणतीही स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. हवा नक्कीच फिरली आहे पण ती पूर्णपणे महायुतीच्या बाजूने. विरोधकांमधील बेबनाव, कांगावा आणि विकासाच्या दृष्टीचा अभाव, यामुळे नागरिक आपला ठाम पाठिंबा देत आहेत तो महायुती च्या बाजूने, असे स्पष्ट निरीक्षण देखील पाटील यांनी नोंदवले.

Visit  :Policenama.com

You might also like