‘या’ कारणामुळं अल्प मतानं विजयी झालेल्या आमदारांना धडकीच भरली

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले असले तरी राज्यात अद्याप सरकार स्थापन झालेले नाही. मुख्यमंत्री पदावरून भाजप आणि शिवसेने दरम्यान चर्चा न होता दोन्ही पक्षांमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते आणि पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल यांनी तर पुन्हा विधानसभा निवडणुकीचे वक्तव्य केले आहे. तसेच कार्यकर्त्यांना पुन्हा विधानसभा निवडणुकीसाठी तयार राहण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे कमी मतांनी विजयी झालेल्या आमदारांचे टेन्शन वाढले आहे. तर पराभूत उमेदवारांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

बदलत्या राजकीय घडामोडींमुळे राज्यात पुन्हा किंवा मध्यवर्ती निवडणूका होऊ शकतात. अशा स्थितीत निवडणूक पुन्हा लागल्यास काठावर विजयी झालेल्या नवनिर्वाचीत आमदारांची धाकधूक वाढली आहे. मतदान कमी होऊन पराभव होऊ शकतो, ही भिती तर विजयी आमदारांमध्ये आहेच शिवाय आर्थिक नियोजन करण्याचे मोठे आव्हान आहे.

विधानसभेचा निकाल लागून 11 दिवस उलटले आहेत. शिवसेना-भाजपला पूर्ण बहुमत मिळालं आहे. भाजप 105 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर शिवसेनेने 56 जागा जिंकल्या आहे. मात्र मुख्यमंत्री पदावरून सरकार स्थापन करण्याचे रखडले आहे. 105 आमदारांचं संख्याबळ असलेल्या भाजपा-शिवसेनेशिवाय पर्याय नाही. तर दुसरीकडं शिवसेना आपल्याकडं 175 आमदारांचं संख्याबळ असल्याचा दावा शिवसेनेकडून केला जात आहे.

Visit : Policenama.com