राष्ट्रवादीची 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर, नांदगावमधून पंकज भुजबळ तर माढयातून बबनदादा शिंदे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने 77 उमेदवारांची पहिली यादी बुधवारी रात्री उशिरा जाहीर केली होती. त्यानंतर आज (गुरूवार) सकाळी राष्ट्रवादीने 20 उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. त्यामध्ये पुणे जिल्हयाती खेळ-आळंदी मतदार संघासाठी दिलीप मोहिते तर मावळमधून सुनिल शेळके आणि पिंपरीतून श्रीमती सुलक्षणा शिलावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर माढयातून बबनदादा शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांची नावे आणि मतदार संघ –
1. जळगाव शहर – अभिषेक पाटील
2. बाळापूर – संग्राम गुलाबराव गावंडे
3. कारंजा – प्रकाश डहाके
4. मेळघाट – केवळराम काळे
5. अहेरी – धर्मरावबाबा आत्राम
6. दिग्रस – मा. तारीक मो. शमी
7. गंगाखेड – मधूसुदन केंद्र
8. कन्‍नड – संतोष कोल्हे
9. नांदगाव – पंजक भुजबळ
10. बागलाण – दिपीका चव्हाण
11. देवलाली – श्रीमती सरोज अहिरे
12. कर्जत – सुरेश लाड
13. खेड आणि आळंदी – दिलीप मोहिते
14. मावळ – सुनिल शेळके
15. पिंपरी – श्रीमती सुलक्षणा शिलावंत
16. आष्टी – बाळासाहेब आजबे
17. माढा – बबनदादा शिंदे
18. मोहोळ – यशवंत माने
19. माळशिरस – उत्‍तमराव जानकर
20. चंदगड – राजेश नरसिंग पाटील

मावळमधून भाजपचे बंडखोर सुनिल शेळके यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे.

Visit : Policenama.com