कर्जतमध्ये रोहित पवारांना रोखण्यासाठी खा.डॉ. सुजय विखे आत्‍तापासुनच ‘अ‍ॅक्टीव्ह’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार आणि सर्व महत्वाचे नेते मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर दौरे करत असून विधानसभेची जय्यत तयारी सुरु केली आहे. यावेळी तरुणांना संधी देणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ती कृती अवलंबत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदारसंघातून तिकीट देत त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले. मात्र निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

मात्र, या पराभवानंतर पक्षाने विधानसभा निवडणुकीवर जोर दिला असून शरद पवार यांचे दुसरे नातू रोहित पवार कर्जतमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. ते भाजपचे विद्यमान मंत्री राम शिंदे यांच्याविरोधात निवडणूक लढण्यास उत्सुक आहेत. त्याआधीच भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी रोहित पवार यांच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. राम शिंदे यांच्या विजयाची जबाबदारी सुजय विखे यांनी घेतली असून त्यांच्या प्रवेशामुळे या मतदारसंघातील निवडणूक चुरशीची होणार आहे.

कर्जत येथे आयोजित एका कार्यक्रमात सुजय विखे यांनी हे वक्तव्य करून या निवडणुकीत रंगत आणली आहे. त्यामुळे कर्जतची लढत रोहित पवार विरुद्ध सुजय विखे अशीच रंगणार असल्याचे चित्र दिसत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत कर्जतमधून सुजय विखे यांना लीड मिळाले नव्हते. त्यामुळे आता विधानसभेला काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, रोहित पवार यांनी कर्जत विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली असून मागील एक वर्षापासून ते याठिकाणी सतत काम करत आहेत. त्यामुळे ही लढत रंगतदार ठरणार असून या ठिकाणी कोण विजयी होणार हे आगामी निवडणुकीत स्पष्ट होईल.

‘ही’ पथ्ये पाळून थायरॉईड अगदी ‘कंट्रोल’मध्ये आणा

‘कोथिंबीर’चं सेवन डोळयांसाठी अत्यंत फायदेमंद, जाणून घ्या

दातांच्या समस्येवर करा  ‘हे’ घरगुती उपाय

बीट खाल्याचे ‘हे’ चमत्कारिक फायदे ; ‘खुंटते कॅन्सरग्रस्त कोशिकांची वृध्दी’, जाणून घ्या

लहान मुलांना दुधीदात येत असताना होणाऱ्या त्रासावर करा ‘हे’ ५ उपाय