भोसरी : राष्ट्रवादीचे माजी आमदार विलास लांडे आणि माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने दोघांकडून अपक्ष अर्ज

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – एके काळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असणाऱ्या पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी मतदार संघात राष्ट्रवादी पक्षाकडून अधिकृत कोणीच उमेदवारी भरली नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. इच्छुक असणाऱ्यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. राष्ट्रवादीचे भोसरी माजी आमदार विलास लांडे आणि महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. तर महायुतीकडून आमदार महेश लांडगे यांनी आज शक्ती प्रदर्शन करत अर्ज भरला आहे.

पिंपरी चिंचवड शहरावर राज्य करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला या निवडणुकीत उमेदवारी देताना चांगलीच शोधा शोध करावी लागली आहे. महापालिका, भोसरी, चिंचवड आणि पिंपरी मतदार संघ ताब्यात असणाऱ्या पक्षाकडे भोसरीत उमेदवार नसावा याचीच चर्चा रंगली आहे. आज शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र पक्षाकडून कोणीच उमेदवारी अर्ज भरलेला नाही.

शहरातील पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार विलास लांडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे तर पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनीही आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे शहरातील नेते मंडळी उपस्थित होते. मात्र भोसरीत विलास लांडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार घोषित केले असल्याचे सांगण्यात येत आहे. भाजप सहयोगी आमदार महेश लांडगे यांनी आज महायुतीच्या वतीने शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज भरलेला आहे.

visit : Policenama.com