‘शिरुर-हवेली’ विधानसभा मतदार संघात ‘बंडोबा’, पुन्हा हवेलीचा ‘स्वाभिमान’

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – शिरुर-हवेली विधानसभा मतदार संघात निवडणूकीचे चित्र रंगतदार अवस्थेत पोहोचले असून युती व आघाडी या दोन्हीमध्ये काही अलबेल असल्याचे दिसत नाही. कारण भाजप कडून विद्यमान आमदार बाबुराव पाचर्णे यांना तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी आमदार अशोक पवार यांना संधी दिली यामुळे हवेली तालुक्याला नेहमीच सापत्न वागणूक दिली जाते ही सल मनात ठेऊन शिवसेनेचे जिल्हा प्रमुख व जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांनी काल आपला अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. तर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी रात्री कार्यकत्याची बैठक घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन अपक्ष अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतल्याची विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

काल गुरुवारी भाजपचे उमेदवार बाबुराव पाचर्णे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन केले परंतु यात शिवसेनेचे पदाधिकारी फिरकलेच नाहीत याची चर्चा झाली. यावरुन युतीमध्ये सर्व अलबेल आहे अस म्हणता येणार नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेस कडून माजी आमदार अशोक पवार यांनीसुध्दा शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला.

शिरुर हवेली विधानसभा मतदार संघात आजपर्यंतच्या लढती रंगतदार झाल्या आहेत. यावेळी भाजप,  राष्ट्रवादी काँग्रेस मनसेसह वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आपले नशीब आजमावताना दिसत असले तरीही मुख्य लढत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात होणार आहे. अपक्ष उमेदवारांचे चित्र येत्या मंगळवारी स्पष्ट होईल. कारण दोन्ही अपक्ष उमेदवार हवेली तालुक्यातून अर्ज दाखल करत असल्याने हवेलीतील मतदारांना यांच्याकडून किती आत्मविश्वास दिला जाईल यावर चित्र स्पष्ट होईल. परंतु या दोघांपैकी एक उमेदवार कायम राहिला तर मुख्य लढतीला वेगळा रंग चढले.

काल रात्री घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर आज जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी आपला अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. यानंतर पुढील घडामोडीकडे सर्व मतदार संघाचे लक्ष लागले आहे. कारण आता जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके, प्रदीप कंद व मंगलदास बांदल या त्रिकुटामध्ये निवडणुकीला कसे सामोरे जायच याबद्दल ठरवले जाईल असे कळते. यावरुन शिरुर हवेलीत यावेळी जोरदार लढत होणार यात शंका नाही.

visit : Policenama.com