चिंचवड मतदार संघात महायुतीत ‘बंडाळी’, शिवसेना गटनेते राहुल कलाटे देखील मैदानात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात भाजपा-सेना आणि मित्र पक्षांची महायुती झालेली आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघातून महायुतीकडून अधिकृत आमदार लक्ष्मण जगताप यांना उमेदवारी मिळाली आहे. असे असताना आज शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड मनपाचे गटनेते राहूल कलाटे यांनी अपक्ष अर्ज दाखल करत बंडाळी केली आहे. राष्ट्रवादीच्या वतीने प्रशांत शितोळे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे.

चिंचवड विधानसभा मतदार संघ भाजपला गेला असून भाजपकडून आमदार लक्ष्मण जगताप यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. हा मतदार संघ भाजपला गेल्याने शिवसेनेचे इच्छुक उमेदवार राहूल कलाटे यांची अडचण झाली. त्यामुळे ते राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी अर्ज भरण्याची चर्चा सुरू होती. तसे विधानसभा मतदार संघाचा राष्ट्रवादीने अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत सस्पेन्स कायम ठेवला. मात्र आज शेवटच्या दिवशी प्रशांत शितोळे यांनी पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज भरला आणि तो सस्पेन्स संपवला. मात्र शिवसेनेचे इच्छुक आणि नाराज राहूल कलाटे यांनी माघार न घेता अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाळी केली आहे.

visit : Policenama.com