जयंत पाटलांना पराभूत करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा मोठा ‘डाव’, ‘या’ बड्या नेत्याला उतरवणार मैदानात ?

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या घवघवीत यशानंतर आता भाजप विधानसभा निवडणुकीत देखील आघाडीला धक्का देण्याची तयारी करत आहे. या निवडणुकीत भाजपने २२० जागा असे लक्ष ठेवले असून त्यांच्या नेत्यांनी यादृष्टीने मोर्चेबांधणी देखील सुरु केली आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत भाजप काही जागेंवर विशेष लक्ष केंद्रित करून त्या जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.

अशाच प्रकारे भाजप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष  जयंत पाटील यांच्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर या जागेवर देखील लक्ष केंद्रित करत असून यासाठी ते या जागेवर जयंत पाटील यांच्याविरोधात तगडा उमेदवार देणार आहेत. या निवडणुकीत त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे. यासाठी भाजपने मास्टरप्लॅन आखला असून जयंत पाटील यांच्याविरोधात आक्रमक शेतकरी नेते अशी ओळख असणारे सदाभाऊ खोत यांना उतरवण्याचा विचार भाजप करत आहे. सदाभाऊ खोत यांनी  रयत क्रांती संघटना भाजपबरोबर असून ते विधानसभा निवडणुकीत देखील भाजपबरोबर जाणार असल्याने त्यांना या जागेवर भाजप उभे करणार आहे. सदाभाऊ खोत यांनीदेखील भाजपकडे या विधानसभा मतदारसंघाची मागणी केल्याने भाजप देखील सध्या यावर विचार करत असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर आपण स्वतः या जागेवरून लढण्यासाठी इच्छुक असल्याचे सदाभाऊ खोत यांनीदेखील सांगितले आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देखील या जागेसाठी आक्रमक असून ते हि जागा सदाभाऊ खोत यांना देऊन जयंत पाटील यांना धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहेत. त्यामुळे आता मुख्यमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणे  महत्वाचे ठरणार आहे.

मराठा आरक्षणाला तुर्तास स्थगिती नाही, सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

आघाडी काळात रखडलेल्या मराठा मुलांना न्याय, परंतु खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे भवितव्य अधांतरी

अमानुष ! अल्पवयीन मेव्हणीसोबत भावजीची बळजबरी : संपूर्ण कुटुंब व परिसर हादरले
एमआयएम लढविणार विधानसभेच्या ५० जागा !
शरद पवारांनी बहुजनांच्या डोक्यावर पुन्हा राजेशाही बसवली : ‘वंचित’ चा आरोप