महसूल मंत्री चंद्रकात पाटील यांचे भाकित ! म्हणे, १५ सप्टेंबरपासून आचारसंहिता लागू

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात विधानसभा जवळ आल्याने आता राजकारण चांगलेच तापले आहे. यावर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना भाकित केले आहे की राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभा होणार आहेत. यावेळी त्यांनी आचारसंहितेवर देखील भाष्य केले आहे. १५ सप्टेंबर पासून महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होईल आणि १५ ते २० सप्टेंबरच्या दरम्यान राज्यात निवडणूका होतील असे त्यांनी सांगितले आहे. आजच चंद्रकात पाटील यांनी पिंपरी येथे विधानसभेला बारामती जिंकण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले आणि अजित पवारांवर देखील निशाणा साधला.

सध्या महसूल मंत्री चंद्रकात दादा पाटील हे पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्याच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे पालकमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी पुणे जिल्हाचा दौरा केला.

या दौऱ्यात त्यांना अजित दादांना पराभूत करण्यासाठी काही रणनिती आखली आहे का असे विचारण्यात आले होते, यावर बोलताना त्यांनी उत्तर दिले की, येत्या विधानसभा निवडणूकीत आपण अजित पवारांना पराभूत करु असे म्हणले तर तुम्हाला हसू येईल. परंतू बारामती विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी आपण प्रयत्नशील असू असे त्यांनी स्पष्ट केले.

परंतू आता महसूल मंत्री चंद्रकात दादा पाटील यांनी निवडणूकच्या तारखाच सांगितल्याने भाजप कोणती रणनिती आखत आहे याची चर्चा सुरु झाली आहे. १५ सप्टेंबरपासून महाराष्ट्रात आचारसंहिता लागू होईल असे सांगितल्यामुळे आता सर्व पक्ष जोमाने विधानसभेच्या तयारीला लागण्याची चिन्हे आहेत.

You might also like