काँग्रेस-राष्ट्रवादीने विधानसभेला ५० चा आकडा पार करुन दाखवावा ; भाजपच्या ‘या’ मंत्र्याचे आव्हान

नाशिक : पोलीसानामा ऑनलाईन – विधानसभेच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसने तयारीला सुरुवात केली आहे. त्यात काँग्रेसने प्रदेशाध्यक्षांची निवड केली आहे. तर ५ कार्यकारी अध्यक्षांचीही निवड केली आहे. तर भाजपमध्ये लोकसभेच्या विजयामुळे अधिक उत्साह आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी काँग्रेस-राष्ट्रावादी काँग्रेसला आव्हान दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने २८८ पैकी ५० चा आकडा पार करुन दाखवावा, असं आव्हान गिरीश माहाजन यांनी दिले आहे. तसंच काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना अभिनंदन देत टोमणेही त्यांनी लागावले.

थोरात यांनी म्हटलं होते की महाराष्ट्रातील सत्ता पलटणार असल्याचे सांगितले. तसं मुख्यमंत्रीही आघाडीचाच असेल असे वक्तव्य थोरात यांनी केले होते. त्यावर मुख्यमंत्री त्यांचा होणे हा फार दुरचा विषय आहे. काँग्रेस राष्ट्रवादीने राज्यातील २८८ पैकी ५० जागा आणून दाखवाव्यात, असं आव्हान दिले. तसंच मी सांगितलेले आकडे खोटे ठरत नाहीत, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

यावेळी बोलताना महाजन यांनी राष्ट्रावादी आणि काँग्रेसवर ताशेरे ओढले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या काळात विरोधी पक्षनेत्यांपासून अनेक नेते भाजपमध्ये आले. आता तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पुढच्या बाकावरचे सोडले तर त्यांच्या मागे राहायलाही कोणी तयार नाही. पहिल्या फळीतील पण भाजपमध्ये येण्यास उत्सूक आहेत, असा दावाही महाजन यांनी यावेळी केला. तसंच त्यांनी यावेळी बोलताना आषाढी एकादशीला जसे वारकऱ्यांचे डोळे विठुरायाकडे लागतात, तसे आता सगळ्यांचे डोळे भाजपकडे लागले आहेत, असाही टोमणा त्यांनी यावेळी मारला.

दरम्यान, महाजन यांनी यावेळी बोलता बोलता विधानसभा निवडणुकांच्या तारखांबाबतही अंदाज व्यक्त केला. १० किंवा १३ ऑक्टोबरला राज्यात विधानसभा निवडणुका होतील. तसेच १० किंवा १५ सप्टेंबरला आदर्श आचारसंहिता लागू शकते, असा अंदाज गिरीश महाजन यांनी यावेळी वर्तवला.

आरोग्यविषयक वृत्त

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या