राष्ट्रवादीने इंदापूरच्या जागेसाठी अधिक ‘जोर’ लावल्याने हर्षवर्धन पाटील ‘गोत्यात’ !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असून आमदारांनी देखील तिकीटासाठी पक्षबदलास सुरुवात केली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी घड्याळाची साथ सोडत शिवधनुष्य हाती घेतल्यानंतर आता आणखी काही आमदार शिवसेना आणि भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अहिर यांनी प्रवेश केल्यानंतर आता आमदार वैभव पिचड हेदेखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या येत आहे.

त्याच पार्श्वभूमीवर इंदापूरचे माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची बातमी समोर आल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे आपले तिकीट नक्की करण्यासाठीच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे बोलले जात आहे. सध्या इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे आमदार असून ही जागा कोणत्याही परिस्थितीत आम्ही सोडणार नसल्याचे राष्ट्रवादीच्या वतीने सांगण्यात येत आहे.

या ठिकाणी दत्ता भरणे हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असून ते पुन्हा एकदा या ठिकाणाहून इच्छुक आहेत. त्यामुळे जर हि जागा राष्ट्रवादीने सोडली नाही तर हर्षवर्धन पाटील हे भाजपमधून निवडणूक लढवणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. त्यातच त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने चर्चांना अधिक उधाण आले आहे.

या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार असून दोन्ही पक्ष आपल्या विद्यमान आणि जिंकलेल्या जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे २०१४ मध्ये वेगवेगळ्या लढल्यामुळे राष्ट्रवादीला इंदापूरची ही जागा जिंकता आली होती. मात्र आता काँग्रेस पुन्हा हि जागा मागत असल्याने अजित पवार या जागेसाठी अधिक आक्रमक झाले असून कोणत्याही परिस्थितीत हि जागा राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, अजित पवार यांच्या या भूमिकेमुळेच हर्षवर्धन पाटील हे भाजपामध्ये प्रवेश करून भरणे यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता ते कधी भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –