Homeराशी भविष्यRashi Parivartan 2021 : 1 जूनपासून 'सूर्य' आणि 'मंगळ'चे राशी परिवर्तन, कोरोना...

Rashi Parivartan 2021 : 1 जूनपासून ‘सूर्य’ आणि ‘मंगळ’चे राशी परिवर्तन, कोरोना नियंत्रणात येणार?, काही राज्यात राजकीय ‘भूकंप’ अन् अस्थिरता’?, जाणून घ्या

नवी दिल्ली : 1 जून 2021 ला सकाळी 8:31 वाजता सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल. तिथे अगोदरच वृषभ राशीत राहु विराजमान आहे. हे ग्रहगोचर ग्रहणयोग निर्माण करते. सूर्य आणि राहु जेव्हा एकत्र येतात, त्यास ज्योतिष शास्त्रात ग्रहणयोग म्हटले जाते. हा ग्रहणयोग सर्व राशींवर वेगवगळे परिणाम देतो. 2 जूनला मंगळसुद्धा कर्क राशीत प्रवेश करेल तेव्हा हे जे ग्रहगोचरचे परिणाम आहेत ते आपल्या जीवनावर परिणाम करतील.

अनेकांच्या नोकरीवर येऊ शकते टाच
काही परिस्थितीत आपल्या जीवनात खुप सुधारणा होतील. कोरोनाचे जे विस्तृत स्वरूप झाले आहेत, ते कमी होतील. नंतर मंगळ नीच राशी कर्कमध्ये जात आहे, यात पोलीस विभाग येतो. अनेक लोकांच्या नोकरीवर टाच येऊ शकते कारण राहु सूर्यासोबत मिळून ग्रहण दोष बनवत आहे.

हे सूर्य आणि राहु एकमेकांचे परस्पर शत्रु ग्रह असल्याने राहुला सूर्य मात देईल. मात्र आपल्या इतिहासात हे म्हटले आहे की, राहुचे संरक्षण भगवान विष्णूंनी केले होते आणि त्यास सूर्य देवाने दर्शित केले होते. म्हणजे राहु येथे सूर्यसोबत आल्याने राहु कमजोर होईल. राहुच्या अंतर्गत विवाह येतात त्यामध्ये कमतरता दिसेल, विशेषकरून मेष आणि वृश्चिक राशीने थोडे सतर्क रहावे.

कोरोना बर्‍यापैकी नियंत्रणात येईल
एक जूननंतर देशाच्या राजकारणात बरीचशी सुधारणा होईल. येथून भारताचे राजकाण खुप यशस्वी होईल. केंद्र सरकारला अडचणींचा जो सामना करावा लागत होता, त्या अडचणी आता नष्ट होताना दिसतील. जे जातक राहुने प्रभावित आहेत त्यांना सूर्यामुळे त्रास होऊ शकतो. तर फायदा हा होईल की जो आजार पसरत होता, तो थांबेल. कोरोना बर्‍यापैकी नियंत्रणात येईल.

काही राज्यांत राजकीय भूकंप
गोचर वृषभ राशीत होत असून त्याची दृष्टी गोचरच्या मंगळाची रास वृश्चिकवर जात आहे. याचा परिणाम हा होईल मृतांची संख्या कमी होईल. संक्रमित आजार असल्याने तो सूर्याच्या तेजाने मोठ्या प्रमाणात मर्यादित राहील. आता यामध्ये सूर्याच्या सोबत येण्याने काही राज्यांमध्ये राजकीय भूकंप येऊ शकतो. अनेक राज्यांत राजकीय अस्थिरता दिसेल. जे दुष्ट प्रवृत्तीचे लोक होते त्यांना शिक्षा मिळेल.

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News