विद्या बालननं सांगितलं जगभरात फोफावणार्‍या आणखी एका ‘व्हायरस’चं नाव

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  बॉलिवूड स्टार विद्या बालन हिनं अभिनेता मानव कौलसोबत मिळून एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे ज्यामुळं ती चर्चेत आली आहे. यात विद्या म्हणत आहे की, आणखी एक व्हायरस आहे जो चहू बाजूंना पसरला आहे.

विद्यानं नुकताच तिच्या इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला यात विद्या संगत आहे की जगात अफवा व्हायरस पसरत आहे. यात ती सोशल मीडिाया आणि इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाईस पासून दूर राहण्यासाठी सांगत आहे. विद्या म्हणते, मेडिकल रिपोर्टनुसार हा अफवा व्हायरस फोनमधील फॉरवर्ज बटण दाबल्यानं पसरतो.

विद्या असंही म्हणते की, मी तर ऐकलं आहे की, सोशल मीडया अफवा व्हायरसचं रेड झोन आहे. ती सांगते की, इथून मिळालेली कोणतीही माहिती WHO किंवा मिनिस्ट्री ऑफ हेल्थवर पडताळून पहा. कोरोना पसरला आहे पंरतु आता अफवा व्हायरस पसरू द्यायचा नाही.

विद्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती एनटीआरच्या बायोपिकमध्ये एनटीआरच्या पहिल्या पत्नीची म्हणजेच बसवतारकम नंदमुरी ही भूमिका साकारणार आहे. यासाठी तिनं वजनही वाढवलं आहे. याशिवाय ती शकुंतला देवी या सिनेमातही काम करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच ती अक्षय कुमार सोबत मिशन मंगल या सिनेमात दिसली होती. 15 ऑगस्ट 2019 रोजी हा सिनेमा रिलीज झाला होता.

You might also like