ही बाॅलिवूड अभिनेत्री करणार तमिळ चित्रपटात एन्ट्री

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री लवकरच आता तमिळ चित्रपटात एन्ट्री करणार आहे. तिच्या चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदून टाकणारी बातमी आहे. कारण तिच्या चाहत्यांना ती आता एका वेगळ्या वेशात आणि भाषेत काही वेगळा प्रयाेग करताना दिसणार आहे. बॉलिवूड सिनेमा ‘पिंक’ चा तमिळ भाषेत रिमेक होणार आहे. मुख्य म्हणजे याच सिनेमाद्वारे विद्या बालन तामिळ चित्रपटात पदार्पण करणार आहे असे समजत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे दिग्दर्शक एच. विनोद हे आहेत. याबाबत बोलताना एच. विनोद म्हणाले की, “विद्या बालन तमिळ चित्रपतसृष्टीत पदार्पण करत असल्याने आनंद होतो आहे. तमिळ प्रेक्षकांना तिची कला अनुभवायला मिळणार आहे.” याशिवाय पुढे बोलताना, विद्या बालन ही अजित कुमार यांच्यासोबत चित्रपटात आपली भूमिका साकारणार असल्याचेही एच. विनोद यांनी स्पष्ट केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे निर्माता बोनी कपूर आहेत. महत्त्वाचे म्हणजे बोनी कपूर या चित्रपटाद्वारे दक्षिण चित्रपट उद्योगात आपले पाऊल टाकत आहेत असेही समजत आहे. मुख्य म्हणजे या चित्रपटाचे नाव काय असणार आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र चित्रपटाच्या शूटिंगला हैदराबाद मधून सुरुवात झाली आहे. विद्या बालन हिने याआधी ‘कथानायडु’ या तेलगु चित्रपटात काम केले होते.