मुंबईराजकीय

Vidya Chavan | राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षपदी विद्या चव्हाण यांची नियुक्ती; जाणून घ्या विभागनिहाय राष्ट्रवादी महिला अध्यक्षा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी (NCP Women State President) विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची महाराष्ट्र महिला आयोगाच्या (Maharashtra Women’s Commission) अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीचं महिला प्रदेशाध्यक्षपद रिक्त झालं होतं. या पदावर आता विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांची वर्णी लागली आहे. राष्ट्रवादी महिला राष्ट्रीय अध्यक्षा खासदार फौजिया खान (NCP Women National President MP Faujia Khan) यांनी या निवडीची अधिकृतरित्या घोषणा केली.

 

या निवडीनंतर विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनी म्हटले की, देशातील महत्त्वाच्या विषयांकडे दुर्लक्ष होत आहे. महागाई प्रचंड वाढत आहे. आम्ही यावर सातत्याने आवाज उठवणार आहोत. रुपाली चाकणकर यांच्या नंतर अध्यक्षपद खाली होतं. आता यावर माझी निवड झाली आहे, असे विद्या चव्हाण म्हणाल्या. पहिल्यांदा आम्ही विभागवार अध्यक्ष करत असल्याचे त्यांनी सांगितले.

विभागनिहाय राष्ट्रवादी महिला अध्यक्षा

नागपूर विभाग – शाहीन हकीम (Nagpur Division – Shahin Hakeem)
अमरावती विभाग – वर्षा निकम (Amravati Division – Varsha Nikam)

 

मराठवाडा विभाग (Marathwada Division)

औरंगाबाद विभाग – शाझिया शेख (Aurangabad Division – Shazia Sheikh)
लातूर विभाग – वैशाली मोते (Latur Division – Vaishali Mote)

 

पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra)

पुणे विभाग – वैशाली नागवडे (Pune Division – Vaishali Nagwade)

 

कोकण विभाग (Konkan Division)

सिंधुदुर्ग विभाग – अर्चना घारे (Sindhudurg Division – Archana Ghare)
ठाणे विभाग – ऋता आव्हाड (Thane Division – Rita Awhad)

उत्तर महाराष्ट्र विभाग – अनिता परदेशी (North Maharashtra Division – Anita Pardeshi)

 

Web Title :- Vidya Chavan | vidya chavan as ncp women state president also selection of area wise presidents

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

 

 

Back to top button