अभिनेता विद्युत जामवालचा ‘हा’ भयानक स्टंट तुम्हा पाहिला का ? ; व्हीडिओ होतोय व्हायरल

मुंबई पोलीसनामा ऑनलाईन – हॉडिवूड अभिनेता जॅकी चॅन यांनी आपल्या स्टंट्सने सर्वांच्याच मनात घर केले आहे. जॅकी चॅनचे जगभरात सर्वत्र चाहते आहेत. लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटात त्याचे चाहते आहेत. तसंच बॉलिवूडमध्येही त्यांचे अनेक चाहते आहेत. त्यातील एख म्हणजे अभिनेता विद्युत जामवाल हा आहे. विद्युत त्याच्या स्टंट्स आणि मार्शल आर्टसाठी प्रसिद्ध आहेच. त्यावरून तो जॅकी चॅनचा मोठा फॅन आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही.


जॅकी चॅन सध्या चित्रपटात दिसत नसले तरी वर्षाला इंटरनॅशनल अ‍ॅक्शन फेस्टिव्हल आयोजित करतात. या फेस्टिव्हलमध्ये जगभरातील अ‍ॅक्शन फिल्म निर्मात्यांना सन्मानित केलं जातं. यंदाचे फेस्टिव्हल २१ ते २७ जुलैपर्यंत चालणार आहे. त्यासाठी विद्युत जामवाल शुभेच्छा दिल्या आहेत. विद्युतनं दिलेल्या शुभेच्छा जरा हटके आहेत. त्याने एक स्टंट करत या फेस्टिव्हला सुभेच्छा दिल्या आहेत.

विद्युतने आपल्या इन्टाग्राम अकाउंटवर एक स्टंट व्हिडिओ शेअर केला आहे. जो पाहुन तुम्हीही थक्क व्हाल. कारण त्याने केलेला स्टंट पाहताना सोपा वाटतो, पण करण्यासाठी तो खूप कठीण आहे. या स्टंटमध्ये विद्युत  हातात अंडे घेऊन सुरुवातीला एक नंतर दोन अणि शेवटी तीन अशा विटा तोडताना दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करताना विद्युतनं यंदाच्या जॅकी चॅन फस्टिव्हलला हजेरी लावणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे. विद्युत या फेस्टिव्हलला जाणार म्हटल्यावर त्याच्या चाहत्यांना आतुरता आहे ती जॅकी चॅनसोबतच्या त्याच्या फोटोची.

दरम्यान, विद्युत त्याच्या स्टंट युक्त चित्रपटांमुळे अधिक प्रसिद्ध आहे. त्याच्या शेवटचा चित्रपट जंगलीमध्ये त्याने उत्तम काम केले आहे. तर आता तो कमांडो सीरिजमधील कमांडो ३ या चित्रपटाची तयारी करत आहे.

Loading...
You might also like