Video : पडद्यावरच नव्हे तर रिअल लाइफमध्येही ‘सुपर हिरो’ ! अभिनेत्यानं डोळ्यांवर ओतलं वितळतं मेण, डोळे बांधून केले थक्क करणारे ‘स्टंट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार विद्युत जामवाल (Vidyut Jammwal) आज बॉलिवूड फेमस अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. त्याची फायटिंग आणि अ‍ॅक्शन चाहत्यांमध्ये खूप फेमस आहे. अ‍ॅक्टिंगसोबतच तो आपल्या अ‍ॅक्शनसाठीही ओळखला जातो. इतकंच नाही तर पडद्यावरील त्याचे अनेक स्टंट हे खरे असतात.

विद्युतबद्दल बोलायचं झालं तर तो तरबेज मार्शल आर्टिस्ट आहे. लहानपणापासूनच तो कलरिपट्टू या युद्धकलेचं प्रशिक्षण घेत आहे. त्यानं अनेकदा त्याच्या ट्रेनिंगचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावेळीही त्याचा एक थक्क करणारा व्हिडिओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे.

यात तो डोळ्यांवर वितळतं मेण टाकताना दिसत आहे. इतकंच नाही तर डोळ्यांवर पट्टी बांधून तो तलवारबाजीसह अनेक स्टंट करताना दिसत आहे. व्हिडिओत विद्युतचे एकापेक्षा एक स्टंट दिसत आहेत. सध्या त्याचा हा व्हिडिओ सोशलवर तुफान व्हायरल होत आहे.

विद्युतच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं जंगली सिनेमात काम केलं आहे. अनेक दिवसांपासून तो कमांडो 3 सिनेमाची तयारी करत आहे. कमांडो 3 मध्ये अदा शर्मा, अंगिरा धर आणि गुलशन दैवेया यांचीही प्रमुख भूमिका असणार आहे. याशिवाय सिने निर्माता तिग्मांशू धुलिया याच्या डायरेक्शनमध्ये बनलेला त्याचा यारा हा सिनेमा 30 जुलै रोजी ZEE 5 वर रिलीज झाला आहे.

You might also like