धक्कादायक ! लहान मुलांनी चक्क सापाचा वापर करून केली ‘मज्जा’ (व्हिडिओ)

व्हिएतनाम : वृत्तसंस्था – व्हिएतनाममधील एका गावात काही मुली चक्क सापासोबत दोरी उड्या खेळत असल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

https://www.youtube.com/watch?v=On3qhX2IjTI&feature=youtu.be

व्हिएतनाममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विषारी साप आढळतात. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत लहान मुलं सापाचा दोरीसारखा वापर करून दोरी उड्या मारत आहेत. 27 सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये ही लहान मुलं सापाला पकडून हवेत उडवत असल्याचे भयानक दृश्य दिसत आहे. एका महिलेने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे.

Visit :  Policenama.com