‘विहंगम’ योग संस्थानाद्वारे पुण्यात भव्य अध्यात्मिक कार्यक्रम, ५०१ कुंडीय विश्व शांती यज्ञ, तुम्ही देखील घ्या ‘लाभ’ !

पुणे : पोलीसनाम ऑनलाईन – विहंगम योग संस्थानाच्या वतीने पुण्यात, येत्या १६ आणि १७ नोव्हेंबर ला डेक्कन कॉलेज ग्राउंड, बॉम्बे सॅपर्स शेजारी, येरवडा, येथे एक भव्य दिव्य विहंगम योग समारोह आणि ५०१ कुंडीय विश्व शांती यज्ञाचे (हवनाचे) आयोजन करण्यात आले आहे.

१६ नोव्हेंबर- संध्याकाळी ५ वाजेपासून – दिव्यवाणी, अमृतवाणी आणि त्यानंतर महाप्रसाद,
१७ नोव्हेंबर- सकाळी ९ पासून – हवन आणि त्यानंतर महाप्रसाद असे कार्यक्रमाचे स्वरूप असेल.

हा एक वैषिठ्यपुर्ण कार्यक्रम असून ह्यात विहंगम योगाचे तत्वज्ञान आणि साधना प्रणालीचे मार्गदर्शन केले जाते. विहंगम योग ही एक प्राचीन योग पद्धती आहे आणि त्या ज्ञानाचा प्रचार आणि प्रसार हा एकमेव ह्या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

सद्गुरू सदाफलदेव महाराजांनी स्थापन केलेली विहंगम योग संस्था १९२४ सालापासून ह्या प्रचार आणि प्रसार सेवेत कार्यरत आहे. या संस्थेला युनाइटेड नेशन्सच्या ECOSOC या विशेष सेलकडून विशेष दर्जा देण्यात आला आहे.

आज मितीस ३५ हून अधिक देशांमध्ये विहंगम योगाचा प्रचार झाला आहे. ५० लाखाहूंन अधिक लोकांनी या साधनेचा लाभ घेतला आहे. विहंगम योग संस्थेच्या वतीने ही ध्यान पद्धती या ज्ञानाचा प्रसार व्हावा याच हेतूने सगळ्यांना विनामूल्य शिकवली जाते.

विहंगम योगाच्या ध्यान पद्धतीवर झालेल्या वैज्ञानिक संशोधनातून आश्चर्यकारक असे निष्कर्ष समोर आलेत. ध्यान करणारी व्यक्ती, ही शांत होऊन अधिक सतर्क होते, आणि मेंदूच्या स्ट्रेस निर्माण करणाऱ्या लहरी कमी होऊन आनंद आणि शांतीचा अनुभव देणाऱ्या लहरी कैक पटीने वाढल्याचे प्रयोगाअंती सिद्ध झाले आहे. याला रेस्टफ़ूल अलर्टनेस असे म्हणतात. मनोकायिक आजार जसे की बीपी, शुगर, डिप्रेशन नियंत्रणात आणण्यासाठी ही ज्ञान प्रणाली उत्तम आहे

अधिकाधिक लोकांपर्यंत हा कार्यक्रम तुमच्या माध्यमातून पोहोचावा आणि या प्राचीन ज्ञानाचा प्रसार व्हावा जेणेकरून लोकांना याचा लाभ व्हावा हाच एकमेव उद्देश कार्यक्रमाचे आयोजन करण्यामागे आहे. सर्वांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य खुला आहे. या प्रेस रिलीजच्या निमित्ताने आपणा सर्वांना या कार्यक्रमाचे आग्रहाचे आमंत्रण तसेच तुमच्या समस्त वाचक वर्गाला ही आग्रहाचे आमंत्रण.

Visit : Policenama.com