व्यक्तीविशेष : विजय चव्हाण, अभिनेते

मुंबई:  पोलीसनामा ऑनलाईन

मराठी चित्रपट व रंगभूमीवर आपल्या हरहुन्नरी अभिनयाने आपले स्थान निर्माण करणारे अभिनेते म्हणजेच विजय चव्हाण. ‘मोरुची मावशी ‘ या नाटकाने विजय चव्हाण यांना प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.

विजय चव्हाण यांनी त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. चित्रपट, नाटकातील त्यांच्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला . विजय चव्हाण यांचा जन्म लालबागमधला. मध्यमवर्गीय कुटुंबातील विजय चव्हाण लालबागमधील प्रसिद्ध भारतमाता चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या हाजी कासम चाळीत लहानाचे मोठे झाले. विजय चव्हाण यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल या कॉलेजमधून पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत. मोरूची मावशी हे विजय चव्हाण यांच्या कारकिदीर्तील सगळ्यात गाजलेले नाटक. या नाटकात त्यांनी मोरूची मावशी अप्रतिम रंगवली.
विजय चव्हाण यांनी आतापर्यंत ३५०-४०० चित्रपटांमध्ये काम केले. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली आहेत. त्यांना आतापर्यंत अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या “वहिनीची माया” या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. झपाटलेला, पछाडलेला, भरत आला परत यांसारख्या अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.चित्रपटाबरोबरच त्यांनी नाट्यसृष्टीही गाजवली .
[amazon_link asins=’B071JWBFDT,B078YW7FSC’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’41eee0b8-a7a0-11e8-ad67-1b3d6561ade9′]

मोरूची मावशी या नाटकात त्यांनी रंगवलेले स्त्री पात्र प्रेक्षक कधीचं विसरू शकत नाहीत. चित्रपट सृष्टीतील सदाबहार अभिनेते अत्यंत साधेपणाने जगले . आजकाल सगळ्यांची गरज बनलेला मोबाईल देखील ते कधीच वापरत नव्हते. अशा या बहुआयामी , मराठी चित्रपट व रंगभूमीवर आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या अभिनेत्याचे आज पहाटे मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात निधन झाले.