Vijay Dhume Murder Case | अनैतिक संबंधातून लाईन बॉय ढुमेचा खून ! सुजाता अन् संदिपनं धरला विजयचा ‘नेम’, इतरांंसह मिळुन केली ‘गेम’

सिंहगड रोड पोलिसांनी खुनाच्या गुन्हयाची 36 तासात उकल करून आरोपींना केले अटक

पुणे : पोलीसनामा ऑलनाइन – Vijay Dhume Murder Case | लाईन बॉय विजय वसंत ढुमे (44, रा. मेट्रोपोलिटीयन आय बिल्डींग, फ्लॅट क्रमांक 904, लिंक रोड, दर्शनजवळ, चिंचवड गाव, तानाजीनगर, पुणे) याचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे उघड झाले आहे (Pune Crime News). सिंहगड रोड पोलिसांनी (Sinhagad Road Police Station) ढुमेच्या खुन प्रकरणाचा 36 तासात छडा लावून 5 जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये एका महिलेसह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. (Vijay Dhume Murder Case)

सुजाता समीर ढमाल (रा. किरकिटवाडी, नांदोशी रोड, पुणे), नवीन प्रियकर संदिप दशरथ तुपे Sandeep Dashrat Tupe (27, रा. मु.पो. कांदलगाव, ता. इंदापुर, जि. पुणे), सागर संजय तुपसुंदर Sagar Sanjay Tupsundar (19, रा. सहकारनगर पोलिस स्टेशनच्या मागे, महात्मा फुले सोसायटी, घर नं. 1025, सहकारनगर नं. 1, पुणे), प्रथमेश रामदास खंदारे Prathamesh Ramdas Khandare (18, रा. आंबेकर हॉटेल जवळ, उंड्री-पिसोळी, पुणे) आणि त्यांच्या एका अल्पवयीन साथीदारास सिंहगड रोड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. (Vijay Dhume Murder Case)

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 29 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास दावट हॉटेलच्या मागील बाजुस असलेल्या गल्लीतील क्वॉलिटी इन लॉजच्या पार्किंगमध्ये विजय ढुमे याच्या डोक्यात लोखंडी सळई आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण करून खून करण्यात आला होता. गणपती विसर्जन मिरवणुकीच्या नंतर ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली होती. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी प्रकरणाचा तात्काळ छडा लावण्याचे आदेश दिले होते.

सिंहगड रोड पोलिसांनी परिसरातील जवळपास 60 ते 70 सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावरून आणि मयत विजय ढुमेचे जुने प्रेमसंबंध असणारी महिला सुजाता ढमाल हिच्याकडे केलेल्या सखोल तपासावरून, तांत्रिक विश्लेषणावरून संशयितांची नावे निष्पन्न झाली. सुजाता हिच्याकडे सखोल तपास केला असता तिने तिचे जुने प्रेमसंबंध असलेल्या विजय ढुमे याचा नवीन प्रियकर संदिप तुपे आणि त्याच्या साथीदारांसह मिळुन गेम केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी चौघांना अटक केली आहे तर त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

आरोपी संदिप दशरथ तुपे याच्याविरूध्द टेंभुर्णी, इंदापुर आणि हिंदवडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar),
सह पोलिस आयुक्त संदिप कर्णिक (IPS Sandeep Karnik),
अप्पर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील (IPS Pravinkumar Patil),
पोलिस उपायुक्त सुहेश शर्मा (IPS Suhail Sharma),
सहाय्यक पोलिस आयुक्त आप्पासाहेब शेवाळे (ACP Appasaheb Shewale),
वरिष्ठ पोलिस निरीक्षक अभय महाजन (Sr PI Abhay Mahajan),
पोलिस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर (PI Jayant Rajurkar)
यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam),
पोलिस उपनिरीक्षक गणेश मोकाशी (PSI Ganesh Mokashi), सहाय्यक उपनिरीक्षक आबा उत्तेकर,
सतिश नागुल, सुनिल चिखले, पोलिस हवालदार संजय शिदे, देवा चव्हाण, अमोल पाटील,
विकास बांदल, विकास पांडुळे, सागर शेडगे, अविनाश कोंडे, राहुल ओलेकर,
शिवाजी क्षिरसागर, स्वप्नील मगर आणि दक्ष पाटील यांच्या पथकाने केली आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून अटक आरोपींच्या साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime News | पुण्यातील ससून हॉस्पीटलच्या गेटवर अंमली पदार्थाचा मोठा साठा जप्त; कोटयावधीचं एमडी जप्त, प्रचंड खळबळ