Vijay Hazare Trophy | ‘या’ खेळाडूची दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी होणार निवड; ‘तो’ विराट कोहलीचा आहे फेवरेट

चेन्नई : वृत्तसंस्था –  भारतातली स्थानिक वनडे स्पर्धा असणाऱ्या विजय हजारे ट्रॉफीसाठी (Vijay Hazare Trophy) तामिळनाडूच्या (Tamil Nadu) टीमची घोषणा करण्यात आली आहे. या 20 सदस्यांच्या या टीममध्ये (Vijay Hazare Trophy) अनुभवी विकेट कीपर दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि ऑलराऊंडर वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar) यांचा समावेश करण्यात आला आहे. वॉशिंग्टन सुंदर हा विराट कोहलीच्या (Virat Kohli) आवडत्या खेळाडूपैकी एक आहे. दिनेश कार्तिक दुखापतीमुळे सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफी (Syed Mushtaq Ali T-20 Trophy) खेळू शकला नव्हता. या स्पर्धेत तामिळनाडू आणि कर्नाटक (Karnatak) यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत तामिळनाडूने अखेरच्या बॉलवर कर्नाटकवर रोमहर्षक विजय मिळवला. वॉशिंग्टन सुंदर हा दुखापतीमुळे इंग्लंड दौऱ्यापासून टीमबाहेर होता.

 

विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) तामिळनाडूचा एलीट ग्रुप बीमध्ये समावेश करण्यात आला आहे.
टीम सुरुवातीचे आपले सामने तिरुवनंतपूरममध्ये खेळणार आहे.
8 डिसेंबरला तामिळनाडूचा पहिला सामना मुंबईविरुद्ध होणार आहे.
या सामन्यात ऑलराऊंडर विजय शंकरला तामिळनाडूचा कर्णधार करण्यात आले आहे तर उपकर्णधार म्हणून एन जगदीशन (Narayan Jagadeesan)
याची निवड करण्यात आली आहे.
विजय शंकरच्याच नेतृत्वात तामिळनाडूने या अगोदर सय्यद मुश्ताक अली टी-20 ट्रॉफीमध्ये विजय मिळवला होता.

टीम इंडिया डिसेंबर महिन्यात दक्षिण आफ्रिका (South Africa) दौऱ्यावर जाणार आहे.
या दौऱ्यात टीम टेस्ट, वनडे आणि टी-20 सीरिज खेळणार आहे.
जर वॉशिंग्टन सुंदरने विजय हजारे ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली तर त्याची टीम इंडियात निवड होईल.
दुखापतीमुळे सुंदर टी-20 वर्ल्ड कपमध्येही खेळू शकला नव्हता.
टी-20 फॉरमॅटमध्ये सुंदरची कामगिरी चांगली आहे. त्याने 98 टी-20 सामन्यांमध्ये 29 च्या सरासरीने त्याने 74 विकेट घेतल्या आहेत.
यादरम्यान त्याचा इकोनॉमी रेट 6.76 इतका होता.
तसेच त्याने 21 च्या सरासरीने 866 रनसुद्धा केले आहेत.
यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे.

 

Web Title : Vijay Hazare Trophy | vijay hazare trophy washinton sundar fit included in tamil nadu squad could go to india tour of south africa

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

WhatsApp Delta म्हणजे नेमकं काय? तुमच्या एका छोट्या चुकीमुळे WhatsApp होऊ शकते का बॅन; जाणून घ्या सत्य

Honeytrap Gang | हनीट्रॅपच्या माध्यमातून व्यावसायिकाला ब्लॅकमेल करणाऱ्या चौघांना अटक

Farmers Demand | सरकारच्या कल्याणकारी योजना अंमलात आणल्या तर गांजा लागवड थांबवू