Vijay Kedia | दिग्गज गुंतवणुकदाराचे गाणे गाऊन अर्थमंत्री निर्मला सितारमण यांना साकडे, व्हिडिओ जबरदस्त व्हायरल, यूजर्सच्या प्रतिक्रिया लक्षवेधक

Vijay Kedia | investor vijay kedia appealed fm nirmala sitharaman users said ar rehman got tough competition
file photo
ADV

नवी दिल्ली : Vijay Kedia | अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी 23 जुलै रोजी संसदेत 2025-26 साठी अर्थसंकल्प सादर केला होता. यामध्ये त्यांनी इक्विटी आणि डेट इन्स्ट्रूमेंट्समध्ये कॅपिटल गेन्सवर टॅक्स वाढविण्याची घोषणा केली होती. सरकारने अर्थसंकल्पात शॉर्ट टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स 15 टक्के वाढवून 20 टक्के केला आहे. जीएसटी आणताना एक देश एक टॅक्स ची घोषणा करणारे मोदी सरकार आता विविध टॅक्स वाढवत असल्याने नाराजी व्यक्त होत आहे. एका प्रसिद्ध गुंतवणुकदारांने हिच व्यथा गाण्याच्या माध्यमातून अर्थमंत्र्यांसमोर मांडली आहे.

अर्थसंकल्पात लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स 10 टक्केवरून वाढवून 12.5 टक्के करण्याचा प्रस्ताव होता. या बदलानंतर गुंतवणुकदारांमध्ये मोठी निराशा पसरली होती, त्याचा परिणाम शेयर बाजारावर सुद्धा दिसून आला होता. अनेक गुंतवणुकदारांनी अजूनही सरकारने या निर्णयावर पुन्हा विचार करण्याची विनंती केली आहे.

दरम्यान, देशातील दिग्गज गुंतवणुकदारांपैकी एक असलेले विजय केडिया यांनी गीत गाऊन अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना विशेष आवाहन केले आहे. आपल्यार एक्सवर अकाऊंटवर एक व्हिडिओ शेयर करत विजय केडिया यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासाठी एफएमजी एफएमजी, इतना टैक्स मैं कैसे भरूं, हे गाणे शेयर केले आहे.

केडिया यांचे हे गाणे देशभरात चर्चेचा विषय झाले असून हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. यूजर्स देखील या गाण्याचे कौतुक करत आहेत, आणि विविध कमेंट करत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sachin Waze On Anil Deshmukh | सचिन वाझेंचे अनिल देशमुखांवर गंभीर आरोप; म्हणाले – ‘त्यांच्या पीएमार्फत ते …’

Maval Pune News | धर्मेंद्र- हेमामालिनीला न्यायालयाचा दिलासा; मावळातील जमिनीचे खरेदीखत रद्द करण्याचा दावा फेटाळला

Nashik Phata To Khed Elevated Corridor | केंद्र सरकारकडून पुण्याला मोठी भेट! नाशिकफाटा- खेड एलिव्हेटेड कॉरिडॉरला मंजुरी

Rohit Pawar NCP (SP) | रोहित पवारांना लागले मंत्रिपदाचे वेध?

Total
0
Shares
Related Posts