विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सीची 9,371 कोटींची संपत्ती बँकांना झाली ट्रान्सफर

नवी दिल्ली : वृत्त संस्था – अंमलबजावणी संचालनालयाने (ED) फसवणुक प्रकरणातील फरार आरोपी विजय माल्या (Vijay Mallya), नीरव मोदी (Nirav Modi), मेहुल चोक्सी (Mehul Choksi) ची 9,371 कोटी रुपयांची संपत्ती सरकारी बँकांना ट्रान्सफर केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तिनही फरार आरोपींच्या संपत्तीतून त्यांच्या फसवणुकीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई केली जाईल.

एका वक्तव्यात अंमलबजावणी संचालनालयाने म्हटले की, पीएमएलए अंतर्गत विजय माल्या, नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीच्या प्रकरणात 18,170.02 कोटी रुपयांची
(बँकांना झालेल्या एकुण नुकसानीच्या 80.45%) संपत्ती जप्त केली, तसचे 9371.17 कोटी रुपयांच्या जप्त संपत्तीचा भाग सुद्धा पीएसबी आणि केंद्र सरकारला ट्रान्सफर करण्यात आला आहे.

ईडीने म्हटले की, विजय माल्या आणि पीएनबी बँक फसवणुक प्रकरणांमध्ये बँकांची 40 टक्के रक्कम पीएमएलए अंतर्गत जप्त करण्यात आलेल्या शेयर विक्रीतून वसूल करण्यात आली.

ईडीने म्हटले की, माल्याला कर्ज देणार्‍या आघाडीकडून डेब्ट रिकव्हरी ट्रिब्यूनल्स (DRT) ने बुधवारी युनायटेड ब्रेवरीज लिमिटेड (यूबीएल) चे 5,800 कोटी रुपयांपेक्षा जास्तचे शेयर विकण्यात आले,
जे एजन्सीने पीएमएलए तरतूदी अंतर्गत जप्त केले होते.
ईडीने ही जप्ती 65 वर्षीय माल्याच्या विरूद्ध आपल्या गुन्ह्याच्या तपासाचा भाग म्हणून केली. माल्या सध्या ब्रिटनमध्ये आहे.

सुमारे 22,585.83 कोटीचे नुकसान
ईडीने म्हटले की, मुंबईत विशेष पीएमएलए न्यायालयाच्या निर्देशांवर त्यांनी जप्त केलेले शेयर (यूबीएलचे जवळपास 6,600 कोटी रुपयांचे शेयर) एसबीआयच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे सोपवले,
ज्यानंतर डीआरटीने ही कारवाई केली.

तपास एजन्सीने म्हटले की, माल्या आणि फरार हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी, जे पीएनबी घोटाळ्यात सहभागी होते.
त्यांनी सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना त्यांच्या कंपन्यांद्वारे पैशाची हेराफेरी करून फसवले,
ज्यामुळे बँकांना एकूण 22,585.83 कोटी रुपयांचे नुकसान झाले.

Web Titel : vijay mallya nirav modi mehul choksis assets worth
rs 9371 crore transferred to banks

हे देखील वाचा

Pimpri News | पहिला विवाह झाला असताना लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

‘डोंगर’ पोखरुन ‘उंदीर’ही नाही निघाला; परिवहन मंत्री अनिल परब यांना मोठा दिलासा