विजय माल्याला मोठा धक्का ! SBI सह सर्व बँका संपत्ती विकून करू शकणार ‘वसुली’, PMLA कोर्टानं दिली मंजूरी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – प्रिव्हेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट (PMLA) च्या विशेष कोर्टाने भारतीय स्टेट बँक आणि इतर काही बँकांना विजय मल्ल्याची जप्त केलेली संपत्ती विकून कर्ज वसूल करण्यास परवानगी दिली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) म्हटले होते की, या वसुलीवर आपला कोणताही आक्षेप नसणार आहे.

विजय मल्ल्याच्या वकिलांनी आक्षेप घेतला होता की, केवळ कर्ज वसुली न्यायाधिकरणच याबद्दल निर्णय घेऊ शकते. त्या अनुषंगाने विशेष पीएमएलए कोर्टाने १८ जानेवारीपर्यंत या निर्णयावर स्थगिती दिली आहे, जेणेकरुन मल्ल्या या आदेशाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात दाद मागू शकेल.

बँकांचे जवळपास ९ हजार कोटी रुपयांचे लोन न चुकवल्याने, बनावट आणि मनी लॉन्ड्र‍िंग च्या प्रकरणी मल्ल्यावर ब्रिटनमध्ये खटला चालू आहे.

लंडनमध्ये मल्ल्यावर लागू शकतो निकाल

महत्त्वाचे म्हणजे डिसेंबरमध्ये विजय मल्ल्या प्रकरणातील निकाल लंडन कोर्टाने राखून ठेवलेला आहे. कोर्ट जानेवारीमध्ये विजय मल्ल्यावरील निकाल सुनावू शकतो. त्याचबरोबर विजय मल्ल्यावरील दिवाळखोरीच्या घोषणेची याचिका फेटाळली जाऊ शकते किंवा ही याचिका रद्दही केली जाऊ शकते किंवा मल्ल्याच्या सेटलमेंट ऑफरला भारतीय सर्वोच्च न्यायालयात सहमती होत नाही तोपर्यंत ही याचिका पुढे ढकलली जाऊ शकते. या प्रकरणात यूके कोर्ट भारतीय नियमांच्या प्रासंगिकतेवर विचार करू शकणार आहे.

भारतीय स्टेट बँकेच्या नेतृत्वात भारतीय सरकारी बँकांच्या एका समूहाने ब्रिटनमधील उच्च न्यायालयाला फरार विजय मल्ल्याला जवळपास १.१४५ अब्ज पौंड चे कर्ज न चुकविल्याच्या आरोपाखाली दिवाळखोर म्हणून घोषित करण्याचा आदेश देण्याबाबत पुन्हा अपील केली होती. लंडनमधील उच्च न्यायालयाच्या दिवाळखोरी शाखेत न्यायाधीश मायकल ब्रिग्स यांनी सुनावणी केली.

बँकांच्या बाजूने आला होता लंडन कोर्ट चा निर्णय

उच्च न्यायालयाने पहिल्या दिवशी दिलेल्या निकालात मल्ल्याच्या जगभरातील संपत्तीच्या व्यवहारावर बंदी घातलेल्या आदेश पलटायला नकार देऊन भारतीय कोर्टाच्या त्या निर्णयाने समर्थन कायम ठेवले होते व १३ भारतीय बँकांच्या गटाने सुमारे १.१४५ अब्ज पौंड चे कर्ज परतफेड करणे अधिकृत आहे असा निर्णय दिला होता.

नंतर संपत्ती जप्त करण्याच्या आदेशानुसार बँकांनी नुकसान भरपाईची मागणी सुरू केली. त्याअंतर्गत कर्ज भरपाईसाठी ब्रिटनमधील मल्ल्याची संपत्ती जप्त करण्याची अपील करत मल्ल्यावर दिवाळखोर याचिका दाखल केली.

कुठे आहे मल्ल्या

भारतीय बँकांची फसवणूक प्रकरणातील आरोपी विजय मल्ल्या मार्च २०१६ मध्येच तपासादरम्यान लंडनमध्ये पळून गेला होता. केंद्र सरकार आणि भारतीय तपास यंत्रणा विजय मल्ल्याला परत आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत परंतु अद्याप त्यांना यश मिळालेले नाही.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

मधुमेह असल्यास आहारामध्ये करा ‘या’ ४ पदार्थांचा समावेश
‘हे’ ७ उपाय केल्यास सतत येणारा थकवा जाईल पळून, जाणून घ्या
जेवण पॅक करण्यासाठी ‘फॉईल पेपर’ वापरता ? ‘हे’ ७ दुष्परिणाम जाणून घ्या
मासिक पाळीत स्वच्छता राखण्यासाठी ‘या’ ६ गोष्टी लक्षात ठेवा !
गूळ खाण्याने वाढते वजन, जास्त खाण्याचे ‘हे’ ६ तोटे जाणून घ्या
मातेच्या स्तनपानामुळे बाळांना होतात ‘हे’ ६ फायदे, जाणून घ्या
लवंग खाण्याचे ‘हे’ ६ आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का ?