अभिनेता विजय राज अटकेत, महिला कलाकाराशी हॉटलेमध्ये छेडछाडीचा आरोप

गोंदिया : पोलीसनामा ऑनलाइन   –    चित्रपट ’रन’ मध्ये आपल्या ’कौवा बिरयानी’च्या सीनने लोकप्रिय झालेला अभिनेता विजय राज यास पोलिसांनी महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यात अटक केली आहे. कथित प्रकारे विजय राजवर चित्रपटाच्या सेटवर एका महिला कलाकाराशी छेडछाड केल्याचा आरोप आहे.

या अभिनेत्यावर भादंवि कलम 354 अंतर्गत केस दाखल केली आहे. विजय राज आपल्या टीमसह मध्य प्रदेशच्या बालाघाटमध्ये होता, जेथे तो आपला आगामी चित्रपट ’शेरनी’च्या शुटिंगसाठी पोहचला होता. वृत्तानुसार, सोमवार रात्री उशीरा महिलेच्या तक्रारीवर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये प्रकरण दाखल करून पोलिसांनी मंगळवारी सकाळी अभिनेत्याला अटक केली आहे.

कोन आहे विजय राज

अभिनेता विजय राज बॉलीवुडचा प्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याने अभिनयाची सुरूवात 1999 मध्ये ’भोपाल एक्सप्रेस’ या चित्रपटातून केली होती. यानंतर त्याने अनेक चित्रपटांमधून अभिनय केला, परंतु विजय राजला बॉलीवुडमध्ये खरी ओळख 2004 चित्रपट रन मधून मिळाली होती. ’रन’मध्ये त्याचा ’कौवा बिरयानी’ चा सीन खुप लोकप्रिय झाला होता.विजय राज शेवटचा वेब सीरीज ’परिवार’मध्ये दिसला होता.

यापूर्वी सुद्धा झाली होती अटक

यापूर्वी अभिनेता विजय राजला2005 मध्ये अटक करण्यात आली होती. त्याला त्यावेळी दुबईत ड्रग बाळगल्याच्या आरोपात अटक करण्यात आली होती. मात्र, नंतर त्यास जामीनावर सोडण्यात आले होते.