Vijay Rupani | भाजपा हायकमांडच्या फोनबाबत विजय रुपानी यांनी केला मोठा खुलासा, म्हणाले – रात्री फोन आला आणि सकाळी….

नवी दिल्ली : Vijay Rupani | भाजपा (BJP) हायकमांडने फोन करुन आदेश दिल्यानंतर काही तासांनी मी कोणताही विरोध न करता राज्यपालांकडे राजीनामा (Resignation) सोपवला होता. एक चांगला कार्यकर्ता या नात्याने मी कधीही पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली नाही आणि त्यामुळेच दुसर्‍या दिवशी राजीनामा दिला. हसर्‍या चेहर्‍याने मी माझा राजीनामा सोपवला होता, अशी आठवण गुजरातचे माजी मुख्यमंत्री (Gujarat Former Chief Minister) विजय रुपानी (Vijay Rupani) यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितली आहे. रुपानी यांनी 11 सप्टेंबर 2021 ला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

गुजरातचे मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर विजय रुपानी (Vijay Rupani) यांनी हा खुलासा करताना म्हटले की, मला आदल्या रात्री त्यांनी सांगितले, आणि दुसर्‍या दिवशी मी राजीनामा सुपूर्द केला. मी त्यांना कारणही विचारले नाही, त्यामुळे त्यांनीही सांगितले नाही. मी विचारले असते तर त्यांनी नक्कीच सांगितले असते. पण मी नेहमीच एक शिस्तबद्ध कार्यकर्ता राहिलो आहे. पक्षाने मला जे काही सांगितले ते मी नेहमीच केले आहे. पक्षानेच मला मुख्यमंत्री केले होते. पक्षाने मला आता नवे मुख्यमंत्री येणार असल्याचे सांगितलं आणि मी आनंदाने तयार झालो.

भाजपाने रुपानी (Vijay Rupani) यांच्यावर आता पंजाबचे प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली आहे.
याबाबत ते म्हणाले की, पक्षाने मला प्रथम शहर, नंतर प्रादेशिक स्तरावर जबाबदारी दिली.
याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान मानतो.
पुढे जाऊन मला राज्य पातळीवर सरचिटणीस म्हणून चार वेळा आणि अखेर मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
आता माझ्याकडे राष्ट्रीय स्तरावरील काम सोपवण्यात आले आहे. स्वताला सिद्ध करण्याची ही आणखी एक संधी आहे.

रुपानी यांनी सांगितले की, मी पक्षाकडे काहीही मागितले नसताना त्यांनी सर्व काही दिले.
भविष्यातही पक्ष मला जे काही सांगेल ते करण्याची माझी तयारी आहे.
मी भारत आणि भाजपाचे उज्ज्वल भविष्य पाहत आहे.

Web Title :- Vijay Rupani | bjp vijay rupani reveals high command called and asked to resigned as cm

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ekta Kapoor Arrest Warrant | सैनिकांच्या पत्नींवर आक्षेपार्ह ट्रिपल एक्स वेबसिरीज प्रकरणी एकता कपूरविरोधात अटक वॉरंट

7th Pay Commission DA | केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारकडून मोठे ‘फेस्टिव्हल गिफ्ट’, महागाई भत्त्यात (DA) 4 टक्क्यांनी वाढ