Vijay Rupani | … म्हणून विजय रूपाणींना गमवावे लागले मुख्यमंत्रीपद; PM मोदींच्या कार्यक्रमातही होते उपस्थित  

पोलीसनामा ऑनलाइन  – Vijay Rupani | गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री विजय रूपाणी (Vijay Rupani) शनिवारी दुपारी गेले होते. त्यानंतरच गुजरात मधील राजकीय हालचालींना वेग आला. रूपाणी यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तत्पूर्वीच म्हणजे राजीनामा देण्यापूर्वी  सकाळी ११ वाजता  रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींसोबत (PM Modi) एका कार्यक्रमाला हजेरीही लावली होती. पंतप्रधानांनी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे अहमदाबादमधील सरदारधाम भवनाचे उद्घाटन केले. त्यावेळी ते उपस्थित होते.

या कारणांमुळे द्यावा लागला राजीनामा 

रूपाणी यांनी अचानकपणे राजीनामा दिल्याने अनेक तर्कवितर्क  लढवले जात होते मात्र आता या राजीनाम्यावर काही जाणकारांनी मत व्यक्त केले आहे. विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यामागील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे कोरोना महामारीची परिस्थिती हाताळताना आलेले अपयश मानले जात आहे. कोरोना काळात त्यांनी अनेक निर्णय  मागे घेतले होते. कोरोनाकाळातील सरकारचे अयोग्य व्यव स्थापनेमुळे लोकांमध्ये सरकारविरोधात असंतोष वाढत होता. लोकांचा रोष शांत करण्यासाठी  पक्षाने राज्यातील नेतृत्त्वात बदल केल्याचे बोलले जात आहे.

अधिकाऱ्यांसंदर्भात केंद्राकडे तक्रारी

विजय रुपाणी यांच्या दुसऱ्या कार्यकाळात अधिकाऱ्यांवर त्यांची पकड राहिली  नाही, ते त्यांच्या मर्जीनेच निर्णय घेतात, एवढेच नाही तर ते आमदार आणि कोणत्याही मोठ्या नेत्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात  अशी तक्रार  राज्य संघटना आणि अनेक आमदार सतत्याने केंद्राकडे करत होते.  याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे, गुजरात प्रदेश भाजप अध्यक्ष सीआर पाटील आणि मुख्यमंत्री रूपाणी यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्याही येतच होत्या. या सर्व कारणांमुळेच मुख्यमंत्री रुपाणी यांना बाजूला करून राज्याची कमान नव्या चेहऱ्याकडे  केंद्रीय नेतृत्व सोपवू इच्छित असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.

हे देखील वाचा

CIBIL Score | जर तुमचा क्रेडिट स्कोअर सुद्धा 700 पेक्षा जास्त असेल तर LIC देईल कर्जावर मोठी सूट, जाणून घ्या

Kirit Somaiya | ‘शिवसेनेचा नेता आणि राष्ट्रवादीचा मंत्री रडारवर’, किरीट सोमय्यांचा खळबळजनक गौप्यस्फोट

Pune Crime | 2 कोटीचं फसवणूक प्रकरण : पुण्यातील उद्योजक गौतम पाषाणकर, दीप पुरोहित आणि रिनल पाषाणकर यांच्यावर गुन्हा दाखल; कार्यालयात बोलावून मारहाण करुन केला पाय फ्रॅक्चर

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Vijay Rupani | gujarat why vijay rupani resigns cm post here reasons

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update