ICC World Cup 2019 : टीम इंडियाला तिसरा ‘झटका’, विजय शंकर वर्ल्ड कपच्या ‘बाहेर’

लंडन : वृत्‍तसंस्था – टीम इंडियाला तिसरा झटका बसला आहे. जखमी झालेला विजय शंकर आता वर्ल्ड कपच्या बाहेर झाला आहे. त्यांच्या जागी मयांक अग्रवाल किंवा श्रेयस अय्यर यांना संधी मिळू शकते. सर्वप्रथम गब्बर शिखर धवन अंगठ्याच्या दुखापतीमुळे वर्ल्डकप मधून बाहेर पडला होता. त्यानंतर बॉलर भुवनेश्‍वर कुमार हा देखील जखमी झाल्याने वर्ल्डकपच्या बाहेर पडला. आता विजय शंकर बाहेर पडल्याने भारतीय चाहत्यांवर मोठे संकट आले आहे.

रविवारी इंग्लंड सोबत झालेल्या सामन्यादरम्यान भारताला पराभव स्विकारावा लागला. त्यानंतर विजय शंकर दुखापतीमुळं वर्ल्डकपच्या बाहेर पडल्यामुळे टीम इंडियाच्या अडचणीत आणखीच भर पडली आहे. आगामी दोन सामन्यात कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, विजय शंकर वर्ल्डकपच्या बाहेर पडल्यामुळे चाहत्यांवर मोठं संकट आलं आहे. रिषभ पंतला इंग्लंड सोबत झालेल्या सामन्यात संधी देखील आली. मात्र, त्याला संधीचा फायदा घेता आला नाही.

 ‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा

शाकाहारीं नो, पौष्टिकतेवर लक्ष द्या ; प्रोटिनयुक्त पदार्थ शरीराला आवश्यक

 ‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा

भगव्या जर्सीमुळे भारताचा पराभव, मेहबूबा मुफ्ती यांच्या विधानाने खळबळ

औरंगाबादमध्ये शिवसेना, एमआयएममध्ये पुन्हा जुंपली