ICC World Cup 2019 : चौथ्या क्रमांकाचा दावेदार असलेल्या ‘या’ खेळाडूला नाही संधी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये दुखापत भारतीय संघाचा पिच्छा सोडण्यास तयार नाही. शिखर धवन नंतर पुन्हा एकदा आणखी एक खेळाडू वर्ल्डकपमधून बाहेर पडला आहे. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विजय शंकरच्या टाचेला दुखापत झाल्यामुळं त्याला विश्रांती दिली. त्याच्याजागी रिषभ पंत याला संधी देण्यात आली. जखमी विजय शंकरच्या जागी मयांक अगरवाल याला संधी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. सेमीफायनलमध्ये जागा मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या भारतीय संघाला हा मोठा धक्का समजला जात आहे. मात्र त्याचबरोबर वर्ल्डकप स्पर्धेआधी चौथ्या नंबरसाठी प्रबळ दावेदार समजल्या जाणाऱ्या अंबाती रायडूसाठी हा मोठा धक्का आहे.

शिखर धवन जखमी झाल्यानंतर त्याच्या जागी के.एल. राहुल गेल्याने चौथ्या क्रमांकासाठी रिषभ पंत याला संधी देण्यात आली. त्यामुळे आता विजय शंकरच्या जागी अंबाती रायडू याला संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र बीसीसीआयने मयांक अगरवाल याच्या नावाचा विचार केल्याने अंबाती रायडू पुन्हा एकदा मागे पडला. वर्ल्डकपसाठी १५ जणांचा संघ निवडल्यानंतर अंबाती रायडू याला स्टॅण्डबाय खेळाडू म्हणून ठेवण्यात आले होते, त्यामुळे कोणताही खेळाडू जखमी झाल्यास त्याचा सर्वात आधी विचार केला जाईल अशी अपेक्षा होती. मात्र बीसीसायने त्याच्याजागी मयांक आगरवाल याचा विचार केला.

एकदिवसीय सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अंबाती रायडू याने लाल चेंडूच्या प्रकारातून निवृत्ती स्वीकारून आपले सर्व लक्ष एकदिवसीय सामन्यांकडे वळवले होते. मात्र या निर्णयामुळे त्याला मोठा झटका बसला आहे. दरम्यान, मयांक अगरवाल याने मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांतून पदार्पण केले होते. मात्र त्याने अद्याप एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. त्यामुळे आता तो रोहित शर्माबरोबर सलामीला खेळेल आणि के. एल राहुल पुन्हा चौथ्या क्रमांकावर खेळेल असे बोलले जात आहे.

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा ‘स्ट्रेचिंग’

सौंदर्य वाढविण्यासाठी खोबरेल तेल आहे गुणकारी

‘नाईट शिफ्ट’मध्ये काम करत आहात, मग ‘हे’ पदार्थ अवश्य खा

लिंचींग प्रकरणाला जातीय अथवा धार्मिक रंग देऊन त्याचे राजकारण केले जाऊ नये

वंचितला भाजपची ‘बी’ टीम म्हणणाऱे अशोक चव्हाण नरमले, ती टीका ‘राजकिय’