Vijay Shivtare-Ajit Pawar | शिवतारेंच्या ‘पलटी’ची राज्यात चर्चा, आधी दिली अजित पवारांच्या पराभवाची गॅरंटी, आता म्हणाले ”ते तर कार्यसम्राट!”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Vijay Shivtare-Ajit Pawar | व्यापक हितासाठी मी या निवडणुकीत उतरलोय. बारामतीच्या निवडणुकीला भावनिक करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण अजित पवार हे कार्यसम्राट नेतृत्त्व आहे. अजित पवार हे लोकांसाठी झटणारे नेतृत्त्व आहे, असे गोडवे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी गायले. ते बारामतीमध्ये (Baramati Lok Sabha) एका प्रचारसभेत बोलत होते. मागील काही दिवसात शिवतारे यांनी मारलेल्या पलटीची चर्चा सध्या राज्यभरात आहे. काही दिवसांपूवी अजित पवारांच्या पराभवासाठी सरसावलेले शिवतारे आता त्यांना कार्यसम्राट बोलत आहेत.(Vijay Shivtare-Ajit Pawar)

काही दिवसांपूर्वी विजय शिवतारे यांनी बारामतीमध्ये अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात अपक्ष लढण्याची घोषणा केली होती. येथील साडेपाच लाख पवारविरोधी मतदारांसाठी मी निवडणुकीत उतरलोय असे म्हणत त्यांनी अजित पवारांवर अतिशय बोचरी टीका केली होती.

मी बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. कोणत्याही परिस्थितीत मी माघार घेणार नाही, असेही ते म्हणाले होते. पण अचानक शिवतारे यांनी अशी पलटी मारली की आज त्यांचे प्रत्येक वक्तव्य त्यांच्यासाठी हास्यास्पद ठरत असल्याचे दिसत आहे.

आता ते सुनेत्रा पवार यांच्यासाठी प्रचार करत आहेत. अजित पवार हे कार्यसम्राट नेतृत्त्व आहे.
ते लोकांसाठी झटणारे नेतृत्व आहे, असे शिवतारे म्हणत आहेत.

बारामतीच्या याच सभेत शिवतारे कार्यकर्त्यांना म्हणाले, आपले बूथ सांभाळा. विजय आपलाच आहे.
बारामतीची जागा आपण ३ लाख मतांच्या फरकाने जिंकू. दरम्यान, शिवतारे यांची बदललेली ही भाषा अद्याप लोकांच्या
पचनी पडल्याचे दिसत नाही. यामुळे त्यांच्या पलटीची चर्चा अजूनही सुरूच आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Ajit Pawar | ‘पूर्वी आम्ही घास घास घासायचो, इकडे आलो तर…’, अजित पवारांची तुफान फटकेबाजी

Amol Kolhe On Ajit Pawar | 23 जागांचा निर्णय घेणाऱ्या नेतृत्वाला चारच जागा मिळतात ही शोकांतिका – डॉ. अमोल कोल्हे (Video)

Minor Girl Rape Case Pune | पुणे : मैत्रीचा गैरफायदा घेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार