Vijay Shivtare | ‘सासवड येथील दुहेरी हत्याकांड आमदारांनी पोलिसांवर दबाव आणून दडपले होते’, माजी राज्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

सासवड : पोलीसनामा ऑनलाइन – सासवड येथील दुहेरी हत्याकांड (Saswad Double Murder Case) आमदारांनी पोलिसांवर दबाव आणून दडपले होते, असा आरोप माजी राज्यमंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला आहे. सासवडचा बिहार झाला असून या प्रकरणात आमदार, त्यांचा एक सहकारी, सासवडचे पोलीस (Saswad Police) आणि ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर यांचे कॉल रेकॉर्ड्स तपासावेत, अशी मागणी देखील विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केली. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख (SP Abhinav Deshmukh) आणि हवेलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले (SDPO Bhausaheb Dhole) यांच्या तत्परतेने खुनाला वाचा फुटल्याचे शिवतारे म्हणाले. (Pune Rural Police News)

 

पुंरदर तालुक्यातील ताथेवाडी येथे एका अंडाभुर्जी विक्रेत्याने मारहाण (Beating) करुन अंगावर उकळते पाणी टाकून दोन जणांचा खून (Double Murder In Saswad) केल्याची घटना सासवड घटना सासवड येथे घडली. याबाबत बुधवारी विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप केले. ते म्हणाले, ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरांना हाताशी धरुन हे मृत्यू उपासमारीने झाल्याचा निष्कर्ष काढला होता. तपास न करता पोलीस आणि डॉक्टरांनी ही फाईल बंद करुन टाकली होती. मात्र काही सुजाण लोकांनी याबाबत मला आणि पोलीस अधीक्षकांना गोपनीय माहिती दिल्यानंतर हे प्रकरण समोर आले. सासवड (Saswad Police Station) आणि जेजुरी पोलीस स्टेशनच्या (Jejuri Police Station) कारभारात आमदार आणि त्यांच्या एक सहकारी ढवळाढवळ करीत आहे. तालुक्याची कायदा आणि सुव्यवस्थेची (Law and Order) स्थिती भीषण झाल्याचे शिवतारे म्हणाले.

शिवतारेंचे आरोप बिनबुडाचे आणि खोटे- आमदार संजय जगताप
पुरंदरचा बिहार कोणी केला हे जनतेला माहिती आहे. सासवड येथे दोन कचरावेचकांचा हातगाडीवाल्याचा मारहाणीत झालेला मृत्यू ही घटना नंदनीय आहे. पोलीस प्रशासनाने आरोपीला अटक केली असून, त्याला कायद्यानुसार शिक्षा होईल, असे आमदार संजय जगताप (MLA Sanjay Jagtap) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

 

माजी आमदारांनी केलेले आरोप बिनबुडाचे आणि खोटे आहेत. या घटनेशी अथवा ती दडपण्यात माझा आणि माझ्या कोणत्याही कार्यकर्त्यांचा संबंध नाही.
त्यांनी केलेल्या आरोपांनुसार आमचे कॉल डिटेल्स चेक करुन त्याचा अहवाल जनतेसमोर मांडावा असे माझे मत आहे,
असे आमदार जगताप यांनी पत्रकात म्हटले आहे.

 

पुरंदरमध्ये शिवसेनेच्या (Shivsena) कार्यकर्त्यांवर खंडणी (Ransom Case) आणि अपहरणाचे (Kidnapping Case) गुन्हे दाखल झाल्याच्या घटना ताज्या आहेत.
जेजुरी पोलीस ठाण्यात (Jejuri Police Station) पोंढेतील एका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा (Molestation Case) गुन्हा दाखल झाला आहे.
माजी आमदार शिवतारे यांच्या काळात पुरंदर-हवेलीत 300 पेक्षा अधिक नवीन शस्त्र परवान्यांसाठी शिफारशी दिल्या असून,
त्यांच्याच काळात पुरंदर-हवेलीत खुनाच्या अनेक घटना घडल्या आहेत, असे आमदार जगताप म्हणाले.

 

Web Title :- Vijay Shivtare | Former shivsena mla shivtare attacks on satanding mla and pune rural police over saswad double murder case

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Pimpri Crime | भाजपच्या माजी नगरसेविका जयश्री गावडे यांच्या विरोधात FIR

 

Restaurant Service Charges | रेस्टॉरंटमध्ये खाणार्‍यांसाठी खुशखबर, सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे स्वस्त झाले लंच-डिनर

 

ACB Trap On PSI Yogesh Dhikale | 1 लाखाची लाच घेताना फौजदार अँटी करप्शनच्या जाळ्यात