Vijay Shivtare | ‘मी मावळ मध्ये जनरल डायरसारखा लढलो, पण…’, माजी मंत्री विजय शिवतारेंनी खंत व्यक्त करत दिला ‘हा’ इशारा (Video)

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मावळ लोकसभा निवडणुकीच्या (Maval Lok Sabha elections) वेळी मी खासदार श्रीरंग बारणे (MP Shrirang Barne) यांच्या प्रचारासाठी जनरल डायरसारखा (General Dyer) लढलो, पार्थ पवार (Parth Pawar) यांचा पराभव केला. पण विधानसभेला माझ्या मागं कोणीच उभं राहीलं नसल्याची खंत शिवसेनेचे माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी बोलून दाखवली. पुण्यामध्ये खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांच्या उपस्थितीत शिवसेना पुणे शहर आणि बारामती लोकसभा पदाधिकारी आढावा बैठकीत विजय शिवतारे (Vijay Shivtare) बोलत होते.

 

पुण्यातील वडगाव शेरी या ठिकाणी शिवसेना पदाधिकारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला खासदार संजय राऊत, उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe), पुणे जिल्हा संपर्क प्रमुख सचिन अहिर (Sachin Ahir) उपस्थित होते. पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या (Pune Municipal Election) पार्श्वभूमीवर आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

 

 

 

 

अजित पवारांना इशारा

सर्व सामान्य कार्यकर्त्यांला जिल्हा बँकेमध्ये स्थान मिळत नाही. मी पार्थ पवार विरोधात मावळमध्ये प्रचार केला तर मला खुलं आव्हान देऊन पाडलं असलं तरी महानगर पालिका निवडणुकीमध्ये मी सर्व प्रयत्न करणार असे सांगत एक हाती सत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुरंदरची (Purandar) खुमखुमी मी महापालिकेच्या निवडणुकीत दाखवून देऊ इच्छितो असे म्हणत विजय शिवतारे यांनी पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाच नाव न घेता इशारा दिला.

 

Web Title :- vijay shivtare | i fight general dyer maval vijay shivatare pune corporation purandar shivsena mp sanjay raut

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा