Vijay Shivtare Meet Anantrao Thopate | शिवतारेंनी घेतली अनंतराव थोपटेंची भेट, शरद पवारांची थोपटेंनी सांगितली ‘ही’ कटू आठवण, कोणाचा करणार प्रचार?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Vijay Shivtare Meet Anantrao Thopate | लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीपासून बारामती मतदारसंघ (Baramati Lok Sabha 2024) पवार विरूद्ध पवार (Ajit Pawar Vs Sharad Pawar) संघर्षामुळे चर्चेत आहे. आता तिथे शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांच्यामुळे नवा ट्विस्ट आला आहे. शिवतारे बारामतीमधून लोकसभा लढवणार असून ते रोज अजित पवार यांच्यावर हल्लाबोल करत असल्याने महायुतीच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच आज शिवतारे यांनी भोर येथे जाऊन अनंतराव थोपटे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

शिवतारे-थोपटे भेटीनंतर थोपटे यांनी पत्रकारांशी बोलताना जुन्या आठवणी सांगितल्या. यामध्ये त्यांनी शरद पवारांमुळे आपले मुख्यमंत्रीपद कसे हुकले ते देखील सांगितले. यंदा बारामती लोकसभेला प्रचार कुणाचा करायचा हे अद्याप ठरवले नसल्याचे थोपटे यावेळी म्हणाले. मात्र शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांनी आश्चर्य केले आहे.

पत्रकारांशी बोलताना अनंतराव थोपटे म्हणाले, शरद पवार मला काही दिवसांपूर्वी भेटून गेले. त्यांची मुलगी आणि अजित पवार यांची पत्नी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याच लोकसभा मतदारसंघातून विजय शिवतारे इच्छुक आहेत. त्यामुळे मी कुणाचा प्रचार करणार हे मी कुणालाही सांगितलेले नाही किंवा त्याबाबत कोणताही विचार केलेला नाही.

यावेळी विजय शिवतारे यांनी अनंतराव थोपटे यांना सांगितले की, बारामतीत ६ लाख ८६ हजार मते पवारांच्या बाजूची आहेत.
परंतु साडेपाच लाख मते पवारविरोधी आहेत. हे लक्षात घ्यावे लागेल. एका बाजूला नणंद आणि एका बाजूला भावजय
अशावेळी साडेपाच लोकांनी जायचे कुठे? या लोकांना पवारविरोधी मतदान करायला माझ्या रुपाने संधी मिळेल.
निवडणुकीत आशीर्वाद राहू द्या, अशी विनंती शिवतारे यांनी थोपटेंना केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Lok Sabha Election 2024 | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध आगारात मतदान जनजागृती

Pune Pimpri Chinchwad Crime | पिंपरी : कंटेनरमधून अमेझॉन कंपनीच्या 48 लाखांच्या महागड्या वस्तू लंपास, चालकावर FIR

MIDC Bhosari Accident | पिंपरी : पीएमटीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू, बस चालकावर FIR