Vijay Shivtare On Sanjay Raut | संजय राऊत सिझोफ्रेनिया रुग्णासारखं वागताहेत – विजय शिवतारे

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – Vijay Shivtare On Sanjay Raut | शिवसेना नेते संजय राऊत (Shivsena Leader And MP Sanjay Raut) सिझोफ्रेनियाच्या (Schizophrenia) रुग्णासारखे वागत आहेत. राऊतांना आपल्यालाच सर्व कळत आहे, असा भास होत आहे. ते आपल्याच विचारांच्या गर्तेत असतात. त्यातूनच ते बेछूट विधाने करत आहेत. त्यामुळे पक्षाची अधोगती होत आहे, अशी टीका शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आल्यानंतर माजी मंत्री विजय शिवतारे (Former Minister Vijay Shivtare) यांनी केली आहे. ते एक मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते. (Vijay Shivtare On Sanjay Raut)

 

शिवतारे म्हणाले, मेडिकल टर्ममध्ये सिझोफ्रेनिया नावाचा एक रोग आहे. सिझोफ्रेनिया आजाराचा जो माणूस असतो त्याला काहीच प्रॉब्लेम नसतो. हा आजार हुशार माणसालाच होतो. ही माणसे अतिवाचाराच्या गर्तेत जातात. त्यातून त्यांना वेगवेगळे भास होतात. गोव्यात आमच्याशिवाय सरकार होणार नाही हा भास त्यांना झाला. आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) ते घेऊन गेले. आणि तिथे तमाशा झाला.

 

त्यावेळी फडणवीस म्हणाले होते, आमच्याशी यांची लढाई नाही. यांची लढाई नोटाशी आहे. खरोखरच नोटापेक्षाही कमी मते मिळाली. नामुष्की झाली. त्यांना दुसरा भास झाला. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर योगी सरकारला दाबू शकतो. उत्तर प्रदेशात 139 उमेदवार उभे केले. सर्वांचे डिपॉझिट जप्त झाले. तिसरा भास झाला एक ना एक दिवस आम्ही दिल्ली काबीज करू आणि दिल्लीवर उद्धव ठाकरे पंतप्रधान म्हणून असतील. चुकीच्या प्रकारे विचार करून प्रखरपणे ते बिंबवतात. त्यातूनच हा प्रकार झाला की काय असे वाटते, अशी टीका शिवतारे यांनी केली. (Vijay Shivtare On Sanjay Raut)

राऊत यांच्यावर टीका करताना विजय शिवतारे म्हणाले, शिवसेनेत झालेल्या बंडाला संजय राऊतच जबाबदार आहेत. राऊतांमुळेच सर्व काही होत आहे. राऊतांची भक्ती किंवा निष्ठा उद्धव ठाकरेंशी किती आणि पवारांशी किती हे सर्वांना माहीत आहे. जे महाराष्ट्राला कळत आहे, आमदारांना कळत आहे ते राऊत आणि ठाकरेंना का कळत नाही? असा प्रश्न शिवतारे यांनी उपस्थित केला.

 

शिवतारे पुढे म्हणाले, शिवसेनेत एवढी मोठी फूट पडूनही उद्धव ठाकरेंनी काल कार्यकर्त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी जुळवून घ्यायला सांगितले. हे काय आहे? ही भानामती आहे? गारूड आहे? की हिप्नॉटिझम आहे? असे प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत. सर्व सामान्य लोक याबाबत बोलत आहे, असा दावा शिवतारे यांनी केला.

 

शिवसेना नेतृत्वावर टीका करताना शिवतारे म्हणाले, शिवसेनेत झालेल्या बंडानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणे झाले नाही. भेट नाही.
ते मुख्यमंत्री असताना माझ्या मागण्यासाठी अनेक पत्रे लिहिली. त्यावर काहीच निर्णय नाही. त्याला उत्तरही नाही.
आता तर अजिबात भेट नाही. हकालपट्टी काय?… मी पीसी घेतली. आढळराव माझ्यासोबत होते.
त्यांची हकालपट्टी केली. त्यानंतर दोन दिवसानंतर त्यांना पुन्हा पक्षात घेतले. त्यांना सांगितले पुण्यातून लढा.
हा मतदारसंघ मिळणार नाही. ज्यांनी 15 वर्ष मतदारसंघ बांधला. त्यांना सांगतात दुसरीकडे लढा. हा काय प्रकार आहे, असे शिवतारे म्हणाले.

 

Web Title :- Vijay Shivtare On Sanjay Raut | shivsena leader and mp sanjay raut schizophrenia patients former maharashtra minister vijay shivtare slams

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Maharashtra Cabinet Meeting | शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ! आता औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचं धाराशिव नामांतर

 

DA Arrear | 18 महिन्यापासून अडकलेल्या महागाई भत्त्याच्या एरियरचे काय होणार ? केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आली मोठी अपडेट

 

Chasakman Dam | चासकमान धरणातून विसर्ग सुरू, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा