‘त्या’ एका ‘शब्दा’मुळे वडेट्टीवारांचा राजकीय ‘भुकंप’, अजित पवारांनी केला ‘खुलासा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाविकास आघाडीचे सरकार स्थानप झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार लांबल्यामुळे नाराजी होती. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर नाराजीनाट्याला सुरुवात झाली. यातच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांना दुय्यम दर्जाची खाती दिल्याने ते नाराज असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे अद्याप त्यांनी मंत्रिपदाचा पदभार स्विकारला नाही तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही दांडी मारली. विजय वडेट्टीवार यांच्या नाराजीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खुलासा केला आहे.

अजित पवार म्हणाले, विजय वडेट्टीवार नाराज नाहीत. त्यांच्याबाबत एक चूक झाली आहे. त्यांना देण्यात आलेल्या खात्यामध्ये मदत पुनर्वसन ऐवजी भूकंप पुनर्वसन खाते दिलं गेले. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी ते बोदलून देण्याबाबत आश्वासन दिले आहे. मदत ऐवजी भूकंप झाला त्यामुळे वडेट्टीवार हे नाराज असतील. प्रिटींग मिस्टेक यापूर्वी अनेकदा झाल्या आहेत. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करताना काही गोष्टी अनावधाने घडतात. नजीकच्या काळात सर्व गोष्टी स्पष्ट होतील असे त्यांनी सांगितले.

अशोक चव्हाण आणि माझ्यात भांडण नाही
अशोक चव्हाण आणि माझ्यात भांडण झालेले नाही. त्यांनी फोन करून मला विचारलं आपण भांडलो कधी ? कोणाला बैठकितून आधी निघायचं असेल तर ते निघतात मग तुम्ही बातम्या देतात कायतरी बिनसलं. सभागृहातही प्रोटोकॉलप्रमाणे जागा दिल्या तसे बसले होते. मंत्रिमंडळात खुर्च्यावरून वाद झाला या सगळ्या अफवा असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/