Vijay Vadettiwar | ‘दारूची दुकानं सुरू, मंदिरं बंद का? भाजपच्या सवालावर मंत्री वडेट्टीवारांचे उत्तर; म्हणाले…

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मंदिरे सुरु करण्यासाठी आज (सोमवारी) भाजप (BJP) ठिकठिकाणी राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करत आहे. या आंदोलनावरून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी जोरदार निशाणा साधला आहे. ‘केंद्र सरकारच्या (‘Central Government) सूचनेप्रमाणेच राज्य सरकार (State Government) काम करत आहे. त्यामुळे भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी शुद्धीवर असल्यासारखी वक्तव्ये करावी आणि विचार करून भूमिका घ्यावी,’ असा हल्लाबोल देखील मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केला आहे.

आज भाजपच्या (BJP) वतीने राज्यव्यापी शंखनाद आंदोलन होत आहे. मंदिर सुरु करण्यासाठी पंढरपूरसह (Pandharpur) अन्य जिल्यात आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान काही भाजप कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी मंदिरात घुसण्याचा प्रयत्न केला. ‘राज्य सरकारला दारूची दुकानं चालतात, मंदिरं का नको? असा प्रश्न भाजपने उपस्थित केला आहे. भाजपच्या या प्रश्नावर मंत्री वडेट्टीवार (Minister Vijay Vadettiwar) यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. त्यावेळी म्हणाले, ‘भाजपची सरकारं असलेल्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटकात काय सुरू आहे? तिथं कुठं मंदिरं उघडी आहेत? तिथं दारूची दुकानं सुरू नाहीत का? त्यामुळं भाजपच्या लोकांनी शुद्धीवर असल्यासारखं बोलावं. बेशुद्ध, बेधुंद असल्यासारखं बोलू नये,’ अशा शब्दात जोरदार टोला मंत्री वडेट्टीवार यांनी भाजपला लगावला आहे.

Pune Water Supply | गुरुवारी संपुर्ण पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार

पुढं सांगतांना ते म्हणाले की, ‘मंदिरं उघडण्याचा विषयच नाही. केंद्र सरकारने अलीकडे निर्बंधांच्या
सूचना दिल्यात. त्या अनुषंगाने राज्य सरकार पावलं टाकत आहे. केंद्राच्या सूचना फक्त राज्यासाठी
नाहीत, संपूर्ण देशासाठी आहेत. केरळमध्ये अवघ्या ४ दिवसांत पुन्हा १ लाखांहून जास्त नवे कोरोना
रुग्ण आढळून आलेत. म्हणून भूमिका घेताना फक्त सरकारला विरोध म्हणून न बोलता
भाजपवाल्यांनी लोकांचा विचार करावा,’ असा निशाणा वडेट्टीवार (Minister Vijay Vadettiwar) यांनी साधला आहे.

दरम्यान, ‘धार्मिक भावना भडकवून मत मिळवणं एवढचं भाजपचं काम आहे. गोमांसाच्या बाबतीतही भाजपची भूमिका नेहमीच दुटप्पी राहिलीय. मंदिरांच्या बाबतीतही तेच सुरूय. खरंतर त्यांनी मोदींना साकडं घालायला हवं. त्यांचा हा शंखनाद राज्य सरकारच्या विरोधात नसून केंद्राच्या विरोधात असावा, अशी शक्यता देखील त्यांनी व्यक्त केलीय.

हे देखील वाचा

Anti Corruption | 1.20 लाखाची लाच घेताना तहसीलदार आणि शिपाई अँटी करप्शनच्या जाळ्यात

Amravati Crime | दुर्देवी ! एकाच कुटुंबातील तब्बल 11 जणांना विषबाधा; 7 वर्षीय मुलासह आई-वडिलांचा मृत्यू

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  vijay wadettiwar attacks bjp over protest to reopen temples

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update