
Vijay Wadettiwar | ‘आमदारांच्या अपात्रता सुनावणीचे ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण करा’ विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी
पोलीसनामा ऑनलाइन – Vijay Wadettiwar | शिवसेनेमध्ये (Shivsena) एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. ठाकरे गटाने (Thackeray Group) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांवर अपात्रतेची (MLAs Disqualified) याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सांगितल्याप्रमाणे आमदारांच्या अपात्रतेची कारवाई ही विधानसभा अध्यक्ष (Assembly Speaker) घेतील. त्यामुळे आता ही कारवाई विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्याकडे आली असून त्यांनी कारवाईमध्ये दिरंगाई केल्यामुळे त्यांना सुप्रिम कोर्टाने फटकारले देखील आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर चालू असलेल्या आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईचे थेट प्रक्षेपण करा अशी मागणी विधानसभा विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी पत्र लिहित केली आहे.
शिवसेनेतील बंडावरुन सर्वोच्च न्यायालयामध्ये चालू असलेल्या सुनावणीचे थेट प्रक्षेपण दाखवण्यात आले होते. त्याचप्रमाणे आता आमदारांच्या अपात्रतेबाबतची विधानसभा अध्यक्षांसमोर चालू असलेली कारवाई देखील थेट प्रक्षेपणाद्वारे दाखवण्यात यावी अशी मागणी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. विजय वडेट्टीवार यांनी राहुल नार्वेकर यांना पत्रामध्ये लिहिले की, “महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या बंडखोरी प्रकरणी आमदारांच्या अपात्रते संदर्भात आपल्याकडे सुरू असलेल्या कार्यवाहीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील लोकशाही आणि न्यायप्रेमी जनतेचे लक्ष लागले आहे. बंडखोर आमदारांवर नेमकी काय कारवाई होणार हे देखील महाराष्ट्राला कळणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील राजकारणाच्या ढासळत्या दर्जामुळे नागरिकांमध्ये एकंदर राजकीय व्यवस्थेबाबत नकारात्मकता निर्माण झाली असून हे लोकशाहीच्या हिताचे नाही. संवैधानिक संस्था, संवेधनिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे आपण ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपण करावे.” अशी मागणी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पत्राद्वारे केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी हे पत्र ट्वीट देखील केले आहे. ट्वीटरमध्ये विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी लिहिले आहे
की, “शिवसेनेतील अपात्र आमदार प्रकरणाची सुनावणी ऑनलाईन लाईव्ह प्रक्षेपणाद्वारे महाराष्ट्राच्या जनतेपुढे
करण्यात यावी. राज्याच्या इतिहासातील मोठ्या राजकीय बंडखोरी प्रकरणातील आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण
हे विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. लोकशाही व न्यायप्रिय महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष सुनावणीकडे आहे.
संवैधानिक संस्था, संवैधानिक पदे आणि एकंदरीत लोकशाही व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी
आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे लाईव्ह प्रक्षेपण करावे ही मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केलेली आहे. आशा करतो की ते ही मागणी मान्य करतील.“ अशी मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Maharashtra Political News | राष्ट्रवादीचे सुनील तटकरे आणि रोहित पवार यांच्यामध्ये रंगला कलगीतुरा