Vijay Wadettiwar | ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात नव्याने निर्बंध?, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारांचे मोठे वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे (Corona new variant) संपूर्ण जगात भीतीचे सावट निर्माण झाले असताना गुरुवारी केंद्र सरकारने (Central Government) दोन रुग्ण कर्नाटकात (Karnataka) आढळून आल्याची माहिती दिली. त्यामुळे ओमायक्रॉन (Omycron) भारतात दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रुग्ण आढळून येत असले तरी लोकांनी भयभीत न होता कोरोना प्रतिबंधाच्या नियमांचे (Corona rules) पालन करावे आणि लसीकरण करु घ्यावे असे आवाहन आरोग्य मंत्रालयाने केले आहे. कोरोना नियमांचे पालन करावे, गर्दीचे कार्यक्रम टाळावेत, असे केंद्रीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. याच दरम्यान महाराष्ट्रात सुरक्षेच्या दृष्टीने नवी नियमावली जाहीर होण्याची शक्यता आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

 

लोकांमध्ये दहशत निर्माण केली जात आहे
ओमायक्रॉनसंबंधी लोकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोप विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे. तसेच लोकांनी घाबरुन जाऊ नये असे आवाहन केलं आहे. वडेट्टीवार म्हणाले, ओमायक्रॉनसंबंधी लोकांमध्ये फार दहशतीचं वातावरण निर्माण केलं गेलं असं माझं स्पष्ट मत आहे. म्युकरमायकोसिसची (Mucormycosis) जितकी तीव्रता होती किंवा जेवढं नुकसान होत होतं तसं यात काही नाही. लोकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

 

दोन दिवसांत नियमावली
राज्यातील नागरिकांच्या सुरक्षेबाबत राज्य सरकार संवेदनशील आहे. कोविड टास्क फोर्स (Covid Task Force) तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री (CM) दोन दिवसांमध्ये नवीन नियमावलीसंबंधी निर्णय घेतील, असेही विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

परदेशातून आलेले 25 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह
आफ्रिकेसह इतर देशांतून प्रवास करुन भारतात आलेल्या एकूण प्रवाशांपैकी 25 प्रवाशांना कोरोनाची बाधा झाल्याचे आढळून आले आहे. त्यांच्या संपर्कातील तीन जणांना कोरोनाची बाधा झाली असून, एकूण 28 जणांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. गेल्या 24 तासांत मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) 861 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी (RT PCR test) करण्यात आली आहे. त्यापैकी तीन जण बाधित आढळून आले आहेत.

 

29 देशात नव्या व्हेरिएंटचे 373 रुग्ण
जगभरात 29 देशांमध्ये ओमायक्रॉनचे 373 बाधित आढळून आले आहेत. कोरोनाचा हा नवा विषाणू आधीच्या डेल्टासह इतर विषाणूंपेक्षा अधिक घातक आहे की कमी, हे अद्याप संशोधनातून स्पष्ट व्हायचे आहे, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) हवाल्याने सांगितले. जागतिक आरोग्य संघटनेने ओमायक्रॉन विषाणूचा संसर्ग चिंता वाढवणारा असल्याचे म्हटले होते.

 

Web Title :- vijay wadettiwar | corona variant omicron maharashtra government vijay wadettiwar guidelines

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Mumbai Drugs Cases | राज्यातील ‘त्या’ महत्त्वाच्या 5 ड्रग्जच्या केसेस NCB कडे वर्ग करा – गृहमंत्री अमित शाह

Pune Crime | पुण्यातील सराईत गुन्हेगार 1 वर्षासाठी औरंगाबाद कारागृहात स्थानबद्ध ! आतापर्यंत MPDA न्वये CP अमिताभ गुप्तांकडून 47 जणांवर कारवाई

EPF अकाऊंट करा अपडेट, मिळेल 7 लाख रुपयांपर्यंतचा फायदा; जाणून घ्या योजना