Vijay Wadettiwar | राज्यात पुन्हा कडक निर्बंध लावले जाणार का?, वडेट्टीवार म्हणाले…
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama Online) – Vijay Wadettiwar | राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली असतानाच तिसऱ्या लाटेचे (third wave) संकट घोंगावत आहे. त्यामुळे सरकारी पातळीवर तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी वेगाने हालचाली सुरु झाल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) हे विविध यंत्रणांकडून आढावा घेऊन सूचना देत आहेत. आजही त्यांनी राजकीय पक्षांना गर्दीचे कार्यक्रम टाळण्याचे आवाहन केले आहे. याच दरम्यान आपत्ती व्यवस्थापन विभागाची (Disaster Management Department) आज मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली. या बैठकीनंतर राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) हे माध्यमांशी बोलताना कोविड निर्बंध (Covid restrictions) आणि नाईट कर्फ्यू (night curfew) संदर्भात महत्त्वाची माहिती दिली.
मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील
मुख्यमंत्र्यांच्या आवहानाला अनुसरुन विजय वडेट्टीवार यांनी नव्याने काही निर्बंध लागण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले. मुंबई (Mumbai) आणि पुणे (Pune) या शहरांसह काही भागात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढताना दिसत आहेत. ऐन सणासुदीच्या तोंडावर होत असलेली ही रुग्णवाढ पाहता लोकांनी गर्दी करणे टाळले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. काही नवे नियम (New rules) तसेच निर्बंध लावले जाऊ शकतात. यासंदर्भात मुख्यमंत्री एक ते दोन दिवसांत तज्ज्ञांसोबत चर्चा करुन निर्णय घेणार असल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.यावेळी बोलताना त्यांनी गणेशोत्सव (Ganeshotsav) काळात निर्बंध कडक केले जाण्याचे संकेत दिले.
राज्यात नाईट कर्फ्यू नाही
केंद्र सरकारने (Central Government) महाराष्ट्र, केरळ या राज्यांना नाईट कर्फ्यू लावण्यास सांगितले आहे.
या संदर्भात बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्यात नाईट कर्फ्यू लावला जाणार नाही आणि
याबाबत कोणतीही चर्चा आजच्या बैठकीत झालेली नाही, असे वडेट्टीवार यांनी सष्ट केले.
Web Title : Vijay Wadettiwar | decision to impose new restrictions in the state in a couple of days says vijay wadettiwar
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात 5,988 ‘कोरोना’मुक्त, जाणून घ्या इतर आकडेवारी
Health Tips | अकाली मृत्यूचा धोका कमी करायचा असेल तर रोज चाला 7000 पावले – संशोधन
Post Office | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ योजनेत रोज 417 रुपये गुंतवा, व्हाल करोडपती; जाणून घ्या