Vijay Wadettiwar | ‘…तर मी राजीनामा देतो’ – मंत्री विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Vijay Wadettiwar | राज्यात अनेक दिवसापासून ओबीसी आरक्षणाच्या (OBC reservation) मुद्द्यावरुन महाविकास आघाडी सरकार आणि विरोधक यांच्यात सातत्याने खंडाजंगी होताना पाहायाला मिळत आहे. अशामध्येच ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या (Zilla Parishad and Panchayat Samiti) निवडणुका कार्यक्रम झाला. या पार्श्वभुमीवर विरोधक जोरदार आक्रमक झाले आहेत. यावरुन सरकारला घेरात धरलं जात आहे. ओबीसी आरक्षणाच्या विषयावरुन आता मंत्री विजय वडेट्टीवारांनी (Vijay Wadettiwar) मोठं भाष्य केलं आहे. विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना माझ्या राजीनाम्याने प्रश्न सुटणार असेल तर मी राजीनामा देतो, असं ते म्हणाले. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.

विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले की, राज्यात ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC reservation) जिल्हा परिषद, पंचायत समित्या निवडणुका होत आहेत, त्याला काँग्रेस नाही तर भाजपा जबाबदार आहे. विरोधक सांगतायेत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ओबीसी आरक्षण जाण्यास जबाबदार आहे. परंतु, तसं नाही. खोटं बोलून विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत. तत्कालीन सरकारने पाठवलेले सहा पानी पत्र हे ओबीसींच्या जखमेवर मीठ चोळणारं आहे. असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

पुढे वडेट्टीवार बोलताना म्हणाले की, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या रिक्त जागांवर OBC उमेदवार द्यावा ही सर्वांची भूमिका आहे.
मात्र, उद्या याठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा मुद्दा आला तर तिथे OBC समुदायातील माणूस हवा.
पण, सर्वांनीच ठरवलं तर येणाऱ्या निवडणुका ओबीसी विरुद्ध ओबीसी अशीच होतील.
या पाच जिल्ह्यातील पोटनिवडणुकांवर जो काही गोंधळ सुरू आहे.
तो फक्त राजकीय फायदा मिळवण्यासाठी आहे. त्यापलीकडे काही नाही.
त्यामुळे राज्यातील जनता योग्य तो निर्णय घेईल, असं देखील वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

Web Titel :- Vijay Wadettiwar | if my resignation solves issue obc reservation i will resign vijay wadettiwar

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Amenity Space | भाजप पदाधिकार्‍यांच्या चुकांवर पांघरूण घालण्यासाठी पाटलांचे ऍमेनिटी स्पेस विक्रीला समर्थन – राष्ट्रवादी

Pune Crime | महिलांचे मोबाईल हिसकावणारी आंतरराज्यीय टोळी पुणे पोलिसांकडून गजाआड (CCTV Video)

कमाईची गोष्ट ! SBI चा धमाका, आता तुम्हीसुद्धा घरबसल्या कमवा 60 हजार रुपये महिना, जाणून घ्या अटी