Vijay Wadettiwar On Ajit Pawar | विजय वडेट्टीवार यांचा अजित पवारांविरोधात आक्रमक पवित्रा; म्हणाले – ‘हे पाप तरी करू नका…’

चंद्रपूर – पोलीसनामा ऑनलाइन – Vijay Wadettiwar On Ajit Pawar | राज्यामध्ये सध्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये जोरदार आरोप प्रत्यारोप सुरु असल्याचे दिसून येत आहे. विरोधकांनी महायुती सरकारच्या अनेक निर्णयांवर ताशेरे ओढले असून तीव्र विरोध दर्शवला आहे. राज्य सरकारने (State Government) घेतलेल्या कंत्राटी नोकरभरतीच्या (Contract Recruitment) निर्णयामुळे राज्य भरातून नाराजीचा सूर व्यक्त होत असून यासाठी बाहेरील राज्यातील कंपन्यांना कंत्राट दिले गेले असा आरोप केला जात आहे. दरम्यान, सरकारची ही कंत्राटी नोकरभरती काही काळापुरती मर्यादित असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. मात्र आता अजित पवारांच्या या वक्तव्यावरुन विरोधकांनी त्यांना घेरले आहे. तुम्ही खोटं बोलून तरुणांना फसवत आहात आणि स्वतःला मोठा नेता म्हणून घेत असाल तर हे पाप तुम्ही करू नका. अशा शब्दांमध्ये विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांवर निशाणा (Vijay Wadettiwar On Ajit Pawar) साधला आहे.
राज्यामध्ये मागील काही दिवसांपासून कंत्राटी नोकरीभरतीचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला आहे. अनेक तरुणांनी याविरुद्ध आवाज उठवला असून आंदोलने देखील केली आहेत. यावर आता विजय वडेट्टीवार यांनी तरुणांना आंदोलनं करा असे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, “हे नालायक सरकार राज्यातील तरुणाई उद्ध्वस्त करायला निघालंय. मुलांनो रस्त्यावर उतरा, आंदोलन करा, जोपर्यंत हे सरकार अध्यादेश परत घेत नाही तोपर्यंत मागे हटू नका.“ असे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. कंत्राटी नोकरभरतीबाबत स्पष्टीकरण देत अजित पवारांनी सांगितले की. “राज्याच्या काही विभागांमध्ये तातडीने पदभरती करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध विभागांमध्ये कंत्राटी स्वरूपात पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कंत्राटी पदभरतीचा निर्णय हा कायमस्वरूपी नसून, तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे.” असे अजित पवार म्हणाले आहेत. उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या स्पष्टीकरणावरुन विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar On Ajit Pawar) यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
विरोधीपक्षनेते वडेट्टीवार म्हणाले की, “स्वतःला मोठा नेता म्हणावणारे अजित पवार खोटं बोलून तरुणांची फसवणूक (Cheating Case) करत आहेत. अजित पवारांवर माझा हा थेट आरोप आहे. दिशाभूल करणारे वक्तव्य करू नका आणि महाराष्ट्रातील तरुणांना फसवू नका. तुम्ही पक्ष फोडून गेलात, हा तुमचा विषय आहे.
आता तरुणांना उद्धवस्त करण्याचे पाप तरी करू नका.”
अशा शब्दात वडेट्टीवारांनी अजित पवार यांना खडेबोल सुनावले आहेत.
ते पुढे म्हणाले की, “या सप्टेंबर महिन्याच्या 6 तारखेपासून हा शासन अध्यादेश लागू झाला.
आत्ताचे सरकार सांगत आहे की हा आमचा सरकारचा निर्णय होता.
मात्र आमच्या वेळी हा निर्णय केवळ पंधरा प्रवर्गासाठी होता. त्यामध्ये डाटा ऑपरेटर, संगणक चालक यांचा समावेश होता.
सरकारने त्यामध्ये बदल करून शिपाई ते इंजिनियर या सर्वच पदांचा समावेश केला.
पन्नास हजार वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दहा हजार रुपये थेट या कंपनीकडे जातील.
उद्या ही कंपनी 20 हजार रुपये वेतनावर ठेवेल. त्यामुळे राज्यातील तरुणांचे भविष्य उद्धवस्त होईल.”
असे मत विजय वडेट्टीवार यांनी मांडले आहे.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा