Vijay Wadettiwar On Anandacha Shidha | ‘आनंदाचा शिधा’ला भ्रष्टाचाराची कीड, भेसळयुक्त आणि वजनही कमी! गरिबांच्या ताटावर कोण मारतंय डल्ला?

मुंबई : Vijay Wadettiwar On Anandacha Shidha | सणासुदीच्या काळात राज्य सरकारच्या पुरवठा विभागाकडून गोरगरिबांना रास्त दरात धान्य व तत्सम वस्तु पुरवण्यासाठी आनंदाचा शिधा योजना आहे. मात्र या आनंदाच्या शिध्यामध्ये देखील घोटाळा होत असल्याचे उघड झाले आहे. राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शिधावाटप केंद्रावर जाऊन या प्रकाराची पोलखोल केल्याने खळबळ उडाली आहे. (Vijay Wadettiwar On Anandacha Shidha)

या प्रकरणाचा व्हिडिओ वडेट्टीवार यांनी एक्सवर शेअर केला आहे. आनंदाचा शिधा योजनेत घोटाळा झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. वडेट्टीवार यांनी म्हटले की, आनंदाचा शिधा या योजनेमार्फत सरकारकडून कमी वजनाचे धान्य आणि भेसळयुक्त धान्य वाटप केले जात आहे. ज्या कंत्राटदारांकडून या मालाचे वाटप केले जाते, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. (Vijay Wadettiwar On Anandacha Shidha)

वडेट्टीवार यांनी या व्हिडिओत म्हटले आहे की, सरकार खात आहे गरिबांच्या हक्काचा आनंदाचा शिधा. गोरगरिबांना वाटले जात आहे निकृष्ट दर्जाचा किराणा, आणि वजन ही कमी…काल माझ्या ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील शिधा वाटप केंद्राला भेट देऊन वाटप करण्यात येत असलेल्या मालाची तपासणी केली. यामधील अनेक वस्तूंचा माल हा भेसळयुक्त असून मालाचे वजन ही कमी आहे.

एक किलो तेलाच्या पाकिटात फक्त ९०० ग्राम तेल, डाळीच्या पाकिटात १ किलो पेक्षा कमी डाळ आढळून आली. याबाबत तातडीने जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांच्याशी दूरध्वनीद्वारे चर्चा करून कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या प्रकरणी सरकारवर आरोप करताना वडेट्टीवार यांनी म्हटले की, योजनेतील भ्रष्टाचार हा सरकाच्या आशीर्वादाने होत असेल तिथे अधिकारी किती कारवाई करतील ही शंका आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sharad Pawar Public Meeting In Pune | अजित पवारांच्या पुण्यातील रोड-शो नंतर शरद पवारांची जाहीर सभा