Unlock च्या घोषणेवरून वडेट्टीवार यांचे घुमजाव, म्हणाले -‘अनलॉकला तत्वत: मान्यता’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अनलॉकची (Unlock)  घोषणा केली. यानंतर राज्य सरकारमध्ये या निर्णयावरून गोंधळ असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वडेट्टीवार यांनी पुन्हा त्यावर खुलासा केला. मात्र, यावेळी बोलताना त्यांनी निर्णयाला ‘तत्वत: मान्यता’ असा शब्द प्रयोग वापरून आपली बाजू मांडली. तसेच अनलॉकचा (Unlock) अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील असे सांगितले.

काय म्हणाले वडेट्टीवार ?
गफलत वगैरे काहीही नाही. बैठकीत 5 टप्पे ठरवण्यात आले आहेत. त्याला तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. ज्या भागातील जनतेनं सहकार्य केलं, त्या भागातला लॉकडाऊन या प्रक्रियेने कमी करायचा हे धोरण आपण ठरवलं आहे. डिझास्टर मॅनेजमेंटच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री असतात. या निर्णयाला तत्वत: मान्यता मिळाली आहे.

अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील
एकूण पॉझिटिव्हिटी रेट किंवा ऑक्सिजन बेडच्या ऑक्युपन्सीच्या आधारावर निर्णय घेण्याचे ठरले आहे. त्याला तत्वत: मान्यता मिळाली आहे. यामध्ये टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन काढायचा याचा अंतिम आदेश मुख्यमंत्री काढतील, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.

अन् ‘तत्वत: मान्यता’ शब्द अवतरले
पत्रकार परिषदेमध्ये वडेट्टीवार यांनी ‘तत्वत: मान्यता’ या शब्दांचा उल्लेख केला नव्हता.
मात्र, त्यांच्या घोषणेनंतर राज्य सरकारने असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे सांगत प्रस्ताव विचाराधिन असल्याचे सांगितले.
यांनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी घुमजाव करत ‘तत्वत: मान्यता’ मिळाल्याचा उल्लेख केला.

अनलॉकबाबत संभ्रम वाढला
अनलॉकच्या Unlock निर्णयाला तत्वत: मान्यता मिळाल्याचे सांगतानाच असा निर्णय झाला असल्याच्या आपल्या भूमिकेवर वडेट्टीवार ठाम आहेत.
त्यामुळे नेमका अंतिम निर्णय झाला आहे अथवा त्याला फक्त तत्वत: मान्यता मिळाली आहे. याविषयी संभ्रम वाढला आहे.

आख्खा महाराष्ट्र उघडलेला नाही
अनलॉकचा विषय महाराष्ट्रासाठी नाही. अख्खा महाराष्ट्र उघडलेला नाही. ज्या जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट, ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी कमी आहे, तिथे निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला तत्वत: मान्यता मिळाली आहे. निकषांमध्ये जे जिल्हे येतील, त्यामध्ये टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन उघडण्याचा निर्णय झाल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

READ ALSO THIS :

Covid-19 Vaccine : कोविड व्हॅक्सीन घेतल्यानंतर ‘ही’ 7 कामं अजिबात करू नका, ‘या’ गोष्टींची घ्या काळजी; जाणून घ्या

मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे