Vijay Wadettiwar On Sambhaji Bhide | भिडे गुरुजी सरकारचा सांगकाम्या, विजय वडेट्टीवारांची टीका; म्हणाले – ‘अजित पवारांच्या काळजात…’

मुंबई : Vijay Wadettiwar On Sambhaji Bhide | मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) अमरण उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार जालन्यात जाणार आहेत. यावर प्रतिक्रिया देताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसह संभाजी भिडे यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. (Vijay Wadettiwar On Sambhaji Bhide)

राज्य सरकारच्या अपयशावर टीका करताना विजय वडेट्टीवार म्हणाले, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांची भेट घेतलीच पाहिजे. त्याचबरोबर ओबीसी समाजाचे अनेक तरुण आमरण उपोषणाला बसले आहेत, तिथेही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी जावे. त्यांचे उपोषण सोडवावे. सरकारला काही काम उरलेले नाही. त्यांना शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आणि उपोषण सोडवणे एवढेच काम उरले आहे. (Vijay Wadettiwar On Sambhaji Bhide)

मनोज जरांगे यांची मनधरणी करण्यासाठी गेलेले शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर टीका करताना विजय वडेट्टीवर म्हणाले, काल गुरुजींनी त्यांना प्रमाणपत्र दिले, त्यांच्या शिष्यांना प्रमाणपत्र दिले. मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री तुमची फसवणूक करणार नाहीत असे गुरूजी, मनोज जरांगे यांना म्हणाले. त्यांच्यावर विश्वास ठेवा असेही म्हणाले.

आधी शिष्यांनी गुरुजींवर आणि मग लोकांनी शिष्यांवर विश्वास ठेवावा म्हणून गुरुजी त्यांची वकिली करायला गेले होते. त्यापलिकडे जाऊन गुरुजी हे अजित पवारांच्या काळजात घुसून आले. हे काळजीचे लोक आहेत असे प्रमाणपत्र दिले. हा भिडे गुरूजी सरकारसाठी सांगकाम्याचे काम करतो का याचे उत्तर काल लोकांना मिळाले आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते, निपाह व्हायरसच्या संपर्कात आल्यानंतर त्याची लक्षणे 5 ते 15 दिवसांपर्यंत व्यक्तीमध्ये
दिसू लागतात. सर्वप्रथम लक्षण असे की त्या व्यक्तीला ताप येऊ लागतो आणि डोकेदुखीचा त्रास होतो.
तसेच नंतर खोकला, श्लेष्मा आणि श्वास घेण्यास त्रास होतो. सामान्य फ्लू असेल तर तो काही दिवसांत जातो पण
जेव्हा निपाह व्हायरस शरीरावर परिणाम करू लागतो, तेव्हा ताप कायम राहतो आणि घसा देखील दुखतो.
रुग्णाला उलट्या आणि जुलाब देखील होऊ लागतात. आणि रुग्णाला अशक्तपणा जाणवतो.
तसेच स्नायूंमध्ये देखील वेदना होऊ लागतात. निपाह व्हायरसच्या केसेस देशामध्ये वाढत आहेत.
त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञ करत आहेत.
सध्या या व्हायरल विषाणूमुळे सामान्य ताप आणि फ्लूकडे देखील दुर्लक्ष करू नये.
काही लक्षणे जाणवू लागल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

OTT Release Marathi Movie | ओटीटी प्लॅटफॉर्मवर या आठवड्यात ‘हा’ धमाल कॉमेडी चित्रपट रिलीज; चित्रपटाच्या विषयाने वेधले लक्ष