
Vijay Wadettiwar | मुजोर सरकारला झुकावं लागलं, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Vijay Wadettiwar | तहसीलदार (Tehsildar), नायब तहसीलदार (Deputy Tehsildar) यांच्या रिक्त जागा कंत्राटी पद्धतीने भरल्या जाणार असल्याची जाहिरात (Contract Tehsildar Recruitment Advertisement) जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाने काढली आहे. या पदांसाठी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचं जाहिरातीत नमूद केलं आहे. या जाहिरातीवरुन विरोधकांनी सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, कंत्राटी तहसीलदार नियुक्तीसंबंधीची जाहिरात तात्काळ रद्द करण्याचे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. यावर मुजोर सरकारला आज झुकावं लागलं, असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टावार (Vijay Wadettiwar) यांनी हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले वडेट्टीवार?
मुजोर सरकारला विरोधकांच्या आणि राज्यातील तरुणांच्या रोषापुढे आज झुकावं लागलं. परंतु, कंत्राटी तहसीलदार भरतीची जाहिरात ही कोणाच्या डोक्यातून आलेली सुपीक कल्पना होती हा प्रश्न अजूनही अनुत्तरीत आहे. विरोधकांनी टीका केल्यावर शुक्रवारी निघालेली जाहिरात रद्द करण्याचे आदेश महसूल मंत्र्यांनी तीन दिवसांनी दिले.
तीन दिवस महसूल मंत्र्यांना हा विषय महत्वाचा वाटला नाही का? राज्याचे महसूल मंत्री असतात कुठे? त्यांना त्यांच्या खात्यात काय घडत आहे याची माहिती तरी आहे का? की महसूल मंत्री फक्त एका तालुक्याचे मंत्री आहेत? कंत्राटी तहसीलदार भरती जाहिरात रद्द करून जिल्हाधिकारी यांच्याकडून खुलासा मागवला आहे असे महसूल मंत्री म्हणतात. तीन दिवसांनी महसूल मंत्र्यांनी खुलासा मागवला, नशीब कंत्राटी तहसीलदार भरल्यावर खुलासा मागवला नाही!, अशा शब्दात विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी विखे पाटील यांच्यावर हल्लाबोल केला.
काय म्हणाले विखे पाटील?
कंत्राटी तहसीलदार नियुक्तीबाबतची जाहिरात तात्काळ रद्द करा असे आदेश राधाकृष्ण विखे पाटील यांनी जळगावच्या जिल्हाधिकारी यांना दिले आहेत. यासंदर्भात खुलासा करताना विखे पाटील म्हणाले, कंत्राटी पद्धतीने तहसीलदारांची पदं भरण्याचा सरकारचे कोणतेही धोरण नाही.
जळगाव जिल्ह्यात भुसंपादनाच्या कामासाठी अनुभवी लोकांची गरज होती. म्हणून ती जाहीरात काढली होती, शासनाची ही पुर्वपद्धत आहे.
मात्र, या नियुक्तीची जाहिरात काढली गेल्याने आता कंत्राटी पद्धतीनेच तहसीलदार भरती होणार,
असा गैरसमज निर्माण झाला, असेही विखे पाटील यांनी म्हटले.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा