Vijay Wadettiwar | ‘सत्ता प्राप्तीसाठी खाली केलेले खोके पुन्हा भरण्यासाठी पेपर फुटले’, विजय वडेट्टीवारांचा सरकारवर गंभीर आरोप

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – Vijay Wadettiwar | तलाठी भरती घोटाळा (Talathi Bharti Exam Scam) आणि इतर नोकर भरतीमधील पेपरफुटी घोटाळ्यासंदर्भात (Paper Leak Case) अनेक पुरावे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीकडे आहेत. सरकारला वारंवार निवेदने आणि विनंत्या करूनही नोकर भरती घोटाळ्याबाबत सरकारने ठोस निर्णय घेतला नाही. त्यामुळे अ‍ॅड. मनोज पिंगळे (Adv. Manoj Pingle) यांच्यामार्फत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) याचिका दाखल केली आहे. या याचिकेला राजकीय पाठिंबा मिळत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सत्ता प्राप्तीसाठी खाली केलेले खोके पुन्हा भरण्यासाठी पेपर फुटले, असा गंभीर आरोप करत स्पर्धा परीक्षा समितीला पाठिंबा दिल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.

वडेट्टीवार काय म्हणाले?

खोके देऊन पक्ष फोडा, आता खाली खोके पुन्हा भरण्यासाठी नवीन मार्ग शोधा हेच राज्यात सुरू असलेल्या पेपर फुटी मागचे कारण असू शकते असं वाटत आहे. तलाठी भरती, मुंबई पोलीस भरती (Mumbai Police Recruitment), वन विभाग भरती (Forest Department Recruitment) असे तीन तीन महत्वाच्या परीक्षांचे पेपर फुटतात कसे? असा प्रश्न वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे.

https://x.com/VijayWadettiwar/status/1706535715465564253?s=20

ईडी, सीबीआय अश्या कार्यतत्पर संस्था असूनही आरोपी सापडत नाही. त्यामुळे सदर पेपर फुटी रॅकेटला
कोणत्या महाशक्तीचा आशीर्वाद असेल हे तरुणांना कळले आहे. त्यामुळेच त्यांनी या सर्व घोटाळ्यांची न्यायालयीन
SIT मार्फत चौकशी करण्याची आणि तत्काळ फेरपरीक्षा घेण्यात यावी ह्या मागणीसाठी उच्च न्यायालयात याचिका
दाखल केली आहे. या मागणीला आमचा पाठिंबा असून सरकारने न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पाहता
तरुणांच्या मागणीचा विचार करावा, असेही विजय वडेट्टीवार म्हणाले.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Police Crime News | गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांचा झोन पाचमधील सराईत गुन्हेगारांवर कारवाईचा बडगा