Vijay Wadettiwar | विजय वडेट्टीवार यांचा खळबळजनक दावा, म्हणाले -‘फडणवीस आणि गडकरी यांच्यात 36 चा आकडा’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीला (Shivsena BJP alliance) स्पष्ट बहुमत मिळाले होते. परंतु त्यानंतर घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. त्यावेळी राज्यात घडलेल्या घडामोडी बाबत राज्य सरकारमधील मंत्री आणि काँग्रेसचे (Congress) नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची जिरवायची हे भाजप नेते नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याशी बोलून आधीच ठरवलं होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस यांची जिरवायची हे भाजप नेते नितीन गडकरी यांच्याशी बोलून आधीच ठरवलं होते. तसेच देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी या भाजपच्या दोन बड्या नेत्यांमध्ये 36 चा आकडा असलाचा दावा विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केला. नांदेड (Nanded) येथील बिलोली येथील प्रचारसभेत देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी हा दावा केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले, नागपूरवाल्यांना (Nagpur) माहित आहे. तिकडे भाजपमध्ये दोन टोके आहेत. एकीकडे देवेंद्र फडणवीस तर दुसरीकडे नितीन गडकरी, दोघांची तोंडं विरुद्ध दिशेला आहेत. दोघांमध्ये 36 चा आकडा आहे. म्हणून गडकरींनी कानामध्ये गुपचूप सांगितले की, फडणवीसांची जिरवायची होती. तशी ती जिरली. आता पुन्हा जिरवायचीय. पण कुणाची जिरेल ते कळेल. मात्र मी सांगतो पुढचं केंद्रातील सरकार (Central Government) मात्र बदलणार आहे.

हे देखील वाचा

Cryptocurrency | 500 रुपयांत सुद्धा Bitcoin मध्ये करू शकता खरेदी, विक्रमी स्तरावर आहे दर

Quickly Earn Money | 10 हजार रूपये लावून सुरू करू शकता ‘हा’ व्यवसाय, दरमहा होईल 1 लाखापेक्षा जास्त कमाई; जाणून घ्या कशी?

Corona vaccination in India | भारताचा ऐतिहासिक विक्रम ! कोरोना लसीकरणाचा 100 कोटींचा टप्पा पार

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel : Vijay Wadettiwar | vijay wadettiwars big claim about differences between bjp leader devendra fadnavis and minister nitin gadkari

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update