‘या’ 2 सरकारी बँकांमध्ये असेल खाते तर आजपासून बदलले ‘हे’ नियम, जाणून घ्या अन्यथा करू शकणार नाही पैशांचा व्यवहार

नवी दिल्ली : जर तुमचे सुद्धा बँक ऑफ बडौदामध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे. 1 मार्च 2021 पासून विजया बँक किंवा देना बँकेचे IFSC Code बदलतील. म्हणजे आजपासून तुमचे जुने कोड काम करणार नाहीत. जर तुम्हाला ऑनलाइन पैशांचे ट्रांजक्शन करायचे आहे तर यासाठी तुम्ही नवीन आयएफएससी कोड जाणून घ्या, अन्यथा त्रास होऊ शकतो. कशाप्रकारे आपला नवीन कोड जाणून घेऊ शकता याची माहिती घेवूयात…

बँक ऑफ बडोदाने केले ट्विट
देशातील तिसरी सर्वात मोठी सरकारी बँक, बँक ऑफ बडौदाने ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. यामध्ये म्हटले आहे की, प्रिय ग्राहकांनो, कृपया लक्ष द्या, ई-विजया आणि ई-देना आयएफएससी कोड 1 मार्च 2021 पासून बंद होत आहेत. ई-विजया आणि देना बँकेच्या शाखांमधून तुम्ही नवीन आयएफएससी कोड प्राप्त करून घ्या.

टोल फ्री नंबरवर करू शकता कॉल
जर तुम्हाला आयएफएससी कोडसंबंधी काही समस्या असेल तर तुम्ही 1800 258 1700 या टोल फ्री नंबरवर कॉल करू शकता किंवा बँकेच्या ब्रँचमध्ये सुद्धा व्हिजिट करू शकता.

मॅसेज करून घेऊ शकता माहिती
याशिवाय तुम्ही मॅसेज सुद्धा करू शकता. मॅसेजमध्ये तुम्हाला लिहायचे आहे “MIGR Last 4 digits of the old account number” आता या मॅसेजला आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवरून 8422009988 वर पाठवून द्या.

ग्राहकांवर काय होणार परिणाम?
आयएफएससी कोड बदलल्याने खातेधारकांवर परिणाम होईल. ऑनलाइन ट्रांजक्शनसाठी बँक अकाऊंट नंबरसह बँकेचा आयएफएससी म्हणजे इंडियन फायनान्शियल सिस्टम कोड अ‍ॅड करावा लागतो. यासाठी ताबडतोब नवीन आयएफएससी कोड जाणून घ्या, अन्यथा तुम्ही 1 मार्चपासून पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही.

आयएफएससी म्हणजे काय?
आयएफएससी कोड 11 अंकांचा असतो. आयएफएससी कोडमध्ये सुरूवातीची चार अक्षरे बँकेचे नाव दर्शवतात. आयएफएससी कोडचा वापर इलेक्ट्रॉनिक पेमेंट दरम्यान केला जातो. बँकेच्या कोणत्याही ब्रँचला त्या कोडद्वारे ट्रॅक केले जाऊ शकते. तो तुम्ही बँक अकाऊंट आणि चेकबुकद्वारे जाणून घेऊ शकता.