शरद पवारांना धक्‍का देण्यासाठी भाजपकडून विजयसिंह मोहिते-पाटलांना मंत्री पद ?

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. निवडणुकीमध्ये फडणवीस यांनी आखलेल्या रणनितीचा फायदा भाजपाला झाला आहे. राष्ट्रवादीने प्रतिष्ठेचा केलेल्या माढा लोकसभा मतदारसंघ राष्ट्रावादीच्या हातून हिसकावून घेण्यात भाजपाला यश आले. हा मतदारसंघ भाजपाच्या पारड्यात टाकण्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मोहीते पाटील यांचा मोलाचा वाटा होता.

लोकसभा निवडणुकीत भाजपाने मोठे यश मिळवल्यानंतर भाजपाने विधानसभेची तयारी सरु केली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. याच बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्यासाठी मुख्यमंत्री रणनिती आखली असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. शरद पवार यांना धक्का देऊन पश्चिम महाराष्ट्रात भाजपाचे कमळ फुलवण्याच्या तयारीत फडणवीस आहेत. यासाठीच सोलापूरमध्ये विजयसिंह मोहीते-पाटील यांना भाजपाकडून ताकद देण्यात येणार आहे. यामुळेच राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावेळी विजयसिंह मोहीते पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद दिले जाण्याची शक्याता आहे.

लोकसभा निवडणुकीत विजयसिंह मोहिते-पाटील यांनी राष्ट्रवादीतमध्ये राहून भाजपाचा प्रचारात भाजपाची भूमीका घेतल्याचे पहायला मिळाले. तसेच माळशीरस परिसरातून भाजपाचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना लाखांचे मताधिक्य देण्याचा शब्द त्यांनी पाळला आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला शब्द खरा केल्याने आता मुख्यमंत्री आपला शब्द पाळणार असल्याची चर्चा आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणुक शरद पवार यांनी प्रतिष्ठेची केल्याने भाजपाने रणजितसिंह मोहिते-पाटील यांना भाजपात घेऊन राष्ट्रवादीला एकप्रकारे धक्काच दिला. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला माढा मतदार संघ आपल्याकडे खेचण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मोहिते-पाटील घराण्याने प्रतिष्ठा पणाला लावली होती. तर राष्ट्रवादीकडून देखील बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.